‘ब्राह्मण बिझनेस फोरम’च्या वतीने ‘ब्रह्मउर्जा २०२५’ पुरस्कार वितरण उत्साहात

‘ब्राह्मण बिझनेस फोरम’च्या वतीने ‘ब्रह्मउर्जा २०२५’ पुरस्कार वितरण उत्साहात



उद्योगशिलता जपतांना सामाजिक भावनांची जाणीव ठेवा आणि वर्तमानात जगा  - सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक  सुनंदन लेले



कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क 

आपण आपला उद्योग करतांना सामाजिक जाणीवांचे भान नेहमी ठेवले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा, नेहमी देण्याची वृत्ती ठेवा, माणसांना जोडा, तसेच यश हे नेहमी सामूहिक असते हे नेहमी लक्षात ठेवा, असे मार्गदर्शन सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक श्री. सुनंदन लेले यांनी केले. ‘ब्राह्मण बिझनेस फोरम’च्या वतीने ३० नोव्हेंबरला हॉटेल सयाजी येथे ‘ब्रह्मउर्जा २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विविध मान्यवरांना पुरस्कार दिल्यानंतर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. ‘जेनरिक आधार’चे संस्थापक श्री. अर्जुन देशपांडे यांनीही उपस्थितांना संबोधित केले. 




यात श्री. सुनंदन लेले यांच्या हस्ते उत्कृष्ट उद्यमशीलता पुरस्कार श्री. नितीन वाडीकर, श्री. विजय पत्की, सौ. रोहिणी परांडेकर, श्री. सचिन शानबाग, वेदमूर्ती सुहास जोशी यांना देण्यात येणार आले. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. 


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर ‘ब्राह्मण बिझनेस फोरम’चे अध्यक्ष  श्री. प्रसाद धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक केले. २०१८ ला स्थापन झालेला फोरम ब्राह्मण उद्योजकांना सतत पुढे नेण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे. यात वर्षभर घेण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. या प्रसंगी उपाध्यक्ष श्री. नरेंद्र जोशी, सचिव श्री. अजिंक्य देशपांडे यांसह पदाधिकारी, तसेच ब्राह्मण उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच शिस्तबद्ध, नियोजित वेळेत झालेल्या या कार्यक्रमाने उद्योजकांना एक नवी उर्जा प्रदान केली.

Comments