आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा गौरव! संयुक्त राष्ट्र-संबंधित CITES ने ‘वनतारा’ला मानले जागतिक दर्जाचे वन्यजीव संरक्षण केंद्र

 आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा गौरव! संयुक्त राष्ट्र-संबंधित CITES ने ‘वनतारा’ला मानले जागतिक दर्जाचे वन्यजीव संरक्षण केंद्र



वैश्विक मानकांची पूर्तता करणारा वनतारा

वन्यजीव कल्याणासाठी पूर्णतः समर्पित: CITES अहवाल


जामनगर (गुजरात) २७ सिटी न्यूज नेटवर्क 

रिलायंस इंडस्ट्रीजद्वारे संचालित वन्यजीव संरक्षण केंद्र ‘वनतारा’च्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च प्रशंसा झाली आहे. उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या COP 20 अंतर्गत CITES च्या 20व्या बैठकीत सदस्य देशांनी मोठ्या बहुमताने भारताच्या बाजूने ठाम भूमिका घेतली. प्राण्यांच्या आयात प्रक्रियेबाबत भारत किंवा वनताराविरुद्ध कारवाई करण्यासाठी कोणताही आधार किंवा पुरावा नसल्याचे स्पष्टपणे नोंदवण्यात आले.



या निर्णयामुळे वनताराच्या कायदेशीर, पारदर्शक आणि विज्ञानाधिष्ठित कार्यप्रणालीवर आंतरराष्ट्रीय शिक्कामोर्तब झाले आहे. सादर झालेल्या अहवालाने पुन्हा सिद्ध केले की वनतारा हा जगातील सर्वाधिक विश्वासार्ह वन्यजीव संरक्षण केंद्रांपैकी एक आहे.


सप्टेंबर 2025 मध्ये CITES सचिवालयाने वनताराचे दोन दिवसांचे व्यापक निरीक्षण केले होते. यात प्राण्यांचे निवासस्थान, वैद्यकीय सुविधा, रेस्क्यू व्यवस्थापन आणि सर्व नोंदींची सखोल तपासणी करण्यात आली. 30 सप्टेंबर रोजी सादर केलेल्या अहवालात वनताराला “आधुनिक सुविधांनी सुसज्ज आणि सक्षम कल्याण प्रणाली असलेले जागतिक दर्जाचे केंद्र” असे वर्णन करण्यात आले. अहवालात स्पष्ट केले आहे की वनताराचा मुख्य हेतू प्राणी-कल्याण आणि संरक्षण आहे आणि तो कोणत्याही प्रकारच्या वन्यजीव व्यापारात सहभागी नाही. केंद्राचे कार्य आधुनिक पायाभूत सुविधा, उन्नत पशुवैद्यक सेवा, संरक्षण विज्ञान आणि जबाबदार देखभालीवर आधारित असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे.



CITES स्टँडिंग कमिटीतील चर्चेदरम्यान बहुसंख्य देशांनी भारताच्या भूमिकेला ठाम आणि स्पष्ट समर्थन दिले. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मिळालेल्या या संदेशाने वनताराविषयी पसरवण्यात आलेल्या सर्व निराधार आरोपांना प्रभावी उत्तर मिळाले आहे.


यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) वनताराला संपूर्ण क्लीन चिट दिली होती. SIT ने केंद्राच्या कायदेशीर, आर्थिक तसेच वन्यजीवांच्या देखरेशीसंबंधी सर्व पैलूंची तपशीलवार चौकशी केली होती. सर्व तक्रारी “निराधार आणि बेबुनियाद” असल्याचे SIT च्या अहवालात नमूद केले गेले. तसेच सर्व प्राणी वैध आयात परवानग्यांसह आणि केवळ गैर-व्यावसायिक उद्देशांसाठीच आणले गेले असल्याची पुष्टीही SIT ने केली होती.


वनतारा केवळ केंद्रीय प्राणी उद्यान प्राधिकरणाच्या (CZA) सर्व नियमांचे पालन करत नाही, तर त्याहून अधिक प्रगत पद्धतींनी कार्य करतो. हे कोणतेही खासगी संकलन नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरील संरक्षण आणि रेस्क्यू केंद्र आहे, ज्याला Global Humane Certified™️ ही मान्यताही प्राप्त झाली आहे.


ही उपलब्धी केवळ वनताराची नसून भारताच्या त्या सामर्थ्याचीही दाद आहे, ज्याने वन्यजीव संरक्षणाला सहानुभूती, विज्ञान आणि काटेकोर अनुपालनाच्या आधारावर जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण करून दिली आहे.

Comments