WPL 2026: मुंबई इंडियन्सने आपल्या चॅम्पियन टीममधील बहुतेक खेळाडूंना पुन्हा संघात घेतले

 WPL 2026: मुंबई इंडियन्सने आपल्या चॅम्पियन टीममधील बहुतेक खेळाडूंना पुन्हा संघात घेतले



“लिलावात आमची रणनीती जुने खेळाडू पुन्हा घेण्याची होती” — नीता अंबानी

• “नीता अंबानींचा आमच्यावरचा विश्वास हीच आमची ताकद” — हरमनप्रीत

• पूनम खेमनार, मिली इलिंगवर्थ आणि निकोला केरीही संघात



नवी दिल्ली २९ सिटी न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली येथे झालेल्या WPL 2026 च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने 2025 च्या विजेत्या संघातील बहुतांश खेळाडूंना यशस्वीरित्या परत मिळवले. टीमच्या मालक नीता एम. अंबानी यांनी सांगितले की, त्यांची रणनीती जुने चॅम्पियन खेळाडू पुन्हा एकत्र आणण्याची होती. अमेलिया केर, शबनिम इस्माईल, सायका ईशाक, सजना आणि संस्कृती गुप्ता यांच्या पुनरागमनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कर्णधार हरमनप्रीत कौर, नॅट स्किव्हर-ब्रंट, हेले मॅथ्यूज, अमनजोत कौर आणि जी. कमलिनी यांना आधीच रिटेन करण्यात आले होते.


या प्रसंगी बोलताना नीता अंबानी म्हणाल्या, “लिलावाचा दिवस नेहमीच रोमांचक असतो. आमची रणनीती अशी होती की, विजेतेपद मिळवून देणाऱ्या संघाला शक्य तितका पुन्हा एकत्र आणावे. अमेलिया केरच्या पुनरागमनाचा मला खूप आनंद आहे आणि आमच्या ‘चार S’ — शबनिम, सायका, सजना आणि संस्कृती — यांचं पुन्हा संघात स्वागत करणं खूप छान आहे. तसेच तीन तरुण खेळाडू—रहीला फिरदौस, नल्ला क्रांती रेड्डी आणि त्रिवेणी वशिष्ठ—यांचंही स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. पूनम खेमनार, मिली इलिंगवर्थ आणि निकोला केरी यांना मुंबई इंडियन्स परिवारात सामील करताना आम्हाला विशेष आनंद आहे.”


लिलावादरम्यान उपस्थित असलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाल्या, “सुरुवातीला थोडी नर्व्हस होते, पण ज्या पद्धतीने आपण नियोजन केलं आणि सर्वांनी सहभाग घेतला, विशेषत: नीता मॅम यांनी, ते अप्रतिम होतं. त्यांनी नेहमीच आमचा पाठिंबा केला आहे. टीमचे जुने चेहरे पुन्हा आमच्यासोबत आहेत, यावरून टीम मॅनेजमेंटला आमच्यावर किती विश्वास आहे हे दिसून येतं.”


मुंबई इंडियन्सने विदेशी खेळाडू निकोला केरी आणि मिली इलिंगवर्थ यांना संघात घेतलं, तर भारतीय तरुण खेळाडू नल्ला क्रांती रेड्डी, त्रिवेणी वशिष्ठ आणि रहीला फिरदौस यांनाही संधी मिळाली. अनुभवी खेळाडू आणि नव्या प्रतिभांच्या संगमासह मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा विजेतेपदाची प्रबळ दावेदार ठरत आहे.

Comments