कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत पडली पहिली नाराजीची ठिणगी
कोल्हापूर १६ सिटी न्यूज नेटवर्क
कालच कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले. संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. सर्वच राजकीय पक्षाची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू झाली. प्रमुख राजकीय पक्षाकडे उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांची मांदियाळी मोठ्या प्रमाणात सुरू झाली. त्यातच काल भाजपचे छत्रपती शिवाजी पेठ मंडल सरचिटणीस सचिन सुतार यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा भाजपाच्या पक्ष नेतृत्वाकडे सुपूर्द केला. सचिन सुतार प्रभाग क्रमांक ९ मधून ओबीसी प्रवर्गातून इच्छुक उमेदवार होते. त्यांनी पक्षाकडे रीतसर उमेदवारी मागितली. मूळ ओबीसी च्या मुद्द्यावर त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. पण उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत मिळताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला . गेली १० वर्षापासून पक्षाची निष्ठावंत सेवा बजावत असताना पक्षाने दिलेली सर्व जबाबदारी योग्य रित्या निभावली तरी आमचा पक्षाने विचार केला नाही याची खदखद इ सिटी न्यूज शी बोलताना व्यक्त केली.
अश्या प्रकारे महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या निष्ठावंतला बगल देण्याचे पहिलीच घटना घडली .त्यामुळे येणाऱ्या काळात नेत्यांचा बंडखोरी रोखण्यासाठी कसंच लागणार आहे
.jpeg)

Comments
Post a Comment