बेळगांव येथील बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनुरकर अजिंक्य

बेळगांव येथील बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनुरकर अजिंक्य



कोल्हापूर १५ सिटी न्यूज नेटवर्क 

 बेळगाव, शास्त्रीनगर गुजरात भवन येथे रविवार 14 डिसेंबर रोजी झालेल्या फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा २०२५ या स्पर्धेत ऋषिकेश कबनुरकर याने ९ व्या फेरीत ८ गुण मिळवून पहिला क्रमांक घेत २१००० रुपये आणि चषक पटकविला. वेंकटेश खाडे -पाटील याने ८ गुण मिळवून ३ रा क्रमांक मिळाला. त्याला १०,००० रुपये पारितोषिक आणि चषक देऊन गौरव करण्यात आला.अशुमन निखिल शेवडे ६ गुण मिळवून अंडर ११गटात पारितोषिक मिळाले 



एआयसीएएफ आणि केएससीए यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने गिरिस्तुती चेकमेट स्कूल ऑफ चेस तर्फे १८ वर्षांखालील मुलांसाठी फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये एकूण १००००० रुपयाची पारितोषिके होती. देशातील २७८खेळाडूनी भाग घेतला त्या मध्ये १०२ फिडे मानांकित खेळाडू होते.


ऋषिकेश हा अनुज अकॅडमी, दाभोळकर कॉर्नर, ताराबाई पार्क येथे सराव करतो. तो स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन माजी सेक्रेटरी कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

वेकेटेश खाडे पाटील हाही अनुज चेस अकॅडमीचा विद्यार्थी आहे तो प्रायव्हेट येथे शिक्षण घेत आहे घेत आहे.




..

Comments