दैनिक राशिभविष्य
गुरूवार, १८ डिसेंम्बर २०२५.
मार्गशीर्ष कृष्ण चतुर्दशी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८२. दक्षिणायन, हेमंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
![]() |
| Book Appointment 9623895866 |
राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
"आज वर्ज्य दिवस आहे" *शिवरात्री*
चंद्र नक्षत्र - अनुराधा/ (रात्री ८.०७ नंतर) ज्येष्ठा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक. (धृती योग, विष्टी करण शांती)
१८ डिसेंम्बर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुम्ही सभ्य, विचारी, हृदयाचे प्रामाणिक, जबाबदारीने काम करणारे, आणि एकांतवासात राहणारे आहात. मात्र व्यवसायात भागीदार पासून तुम्हाला नुकसान होऊ शकते. तुमच्यावर अनेकदा 'न' केलेल्या चुकीचे आरोप लादले जातात. आणि त्यातून कोर्टबाजी देखील होऊ शकते. तुमच्यामध्ये जबरदस्त इच्छाशक्ती आणि कठोरपण असला तरी तुम्ही अडचणींवर मात करू शकत नाही. तुमची प्रकृती उत्तम असते. तुम्हाला वारसाहक्काने संपत्ती मिळते तुम्ही बुद्धिमान असून निर्णय घेताना मात्र तुम्हाला अनेकदा त्रास होतो. वैवाहिक जीवनामध्ये समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागतो. तुम्हाला उत्तम स्मरणशक्तीचे वरदान आहे. आणि भूतकाळातील अनेक घटना तुम्हाला सहज आठवतात.
व्यवसाय:- सैनिक, राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, खाणी तसेच धातू संबंधित व्यवसाय, बांधकाम, जमीन विक्री यातून लाभ होतात.
![]() |
| Book Appointment 9623895866 |
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ अंक:- ३,६,९
शुभ रंग:- पांढरा.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अष्टम स्थनी चंद्र बुध युती आहे. मनाविरुद्ध प्रवास घडतील. अंदाज चुकू शकतात. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची काळजी घ्या. पत्नीसाठी वेळ राखून ठेवा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रिय व्यक्ती सोबत भ्रमंती घडेल. भागीदारी व्यवसायातून नफा वाढेल. मने जुळतील. आनंदी राहाल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) गुप्त शत्रूच्या कारवाया वाढतील. मात्र त्यात तुम्ही कुरघोडी कराल. आर्थिक बाजू भक्कम होईल. दूरगामी परिणाम करणाऱ्या घटना घडतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. मोठ्या व्यवहारात यश मिळेल. गणिती आडाखे बरोबर येतील. वक्तृत्व चमकेल. वास्तू संबंधित प्रश्न मार्गी लागतील. अनुकूल संदेश येईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आज धनप्राप्ती होणार आहे. ग्रहमान अनुकूल आहे. आरोग्यप्राप्ती होईल. सुवर्ण अलंकार प्राप्त होतील. आज तुमची ऊर्जा वाढणार आहे. सौख्य लाभेल.
![]() |
| Book Appointment 9623895866 |
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यावसायिक दृष्टीने अत्यंत उत्तम दिवस आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल. तुमच्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल. लेखकांना उत्तम कालावधी आहे.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) तुमचे वक्तृत्व आणि संभाषण कला यांचा आज नव्याने साक्षात्कार होईल. शब्दभांडार कामाला येईल. संपत्ती वाढेल. सौख्य लाभेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तुमच्याच राशीत चंद्र आणि बुध युती आहे. तुमची कार्यक्षमता अफाट असणार आहे. मन आनंदी राहील. तुमची विलक्षण बुद्धिमता आज चमकून उठणार आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आजचा दिवस खर्चात टाकणारा आहे. वास्तूआणि जमीन संबंधित कामे मार्गी लागतील. घरासाठी एखादी खरेदी होईल. मोठ्या लोकांशी संबंध येईल. मौल्यवान वस्तूची दुरुस्ती करावी लागेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अकराव्या स्थानी चंद्र बुध युती आहे. अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. त्याचा लाभ घ्या. संधीचे सोने करा. वेळ दवडू नका. मनासारख्या घटना घडतील. खरेदी होईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) विनाकारण आळस करू नका. इतरांच्या बद्दल ईर्षा नको. चिडखोरपणा कमी करा. आज केलेल्या कामाचे जरा उशिरा मात्र भरपूर फळ मिळणारआहे. प्रवास घडतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आनंद देणारा दिवस आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. भरभराट होईल. गैरसमज दूर होतील. तीर्थाटन घडेल. कुलदेवतेची कृपा राहील. पांढरे धान्य दान करा.
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

.jpg)
.jpg)
.jpg)
Comments
Post a Comment