प्रभाग क्रमांक ३ मधून अजित तिवडे यांनी केला आपल्या प्रचाराचा दिमाखदार शुभारंभ

 प्रभाग क्रमांक ३ मधून अजित तिवडे यांनी केला आपल्या प्रचाराचा दिमाखदार शुभारंभ




कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर महानगर पालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांची प्रभागात भेटीगाठी सुरू केली आहे . 

कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५- २६ मधील प्रभाग क्रमांक ३ मधून अजित भगवान तिवडे यांनी आपल्या उमेदवारीच्या प्रचाराचा दिमाखदार शुभारंभ केला.



स्वामी समर्थ मंदिर रुईकर कॉलनी येथून अजित तिवडे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ झाला. त्यानंतर श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेऊन भागातील विविध मंदिरातून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर  रुईकर कॉलनी, बापट कॅम्प, कुंभार वसाहत या भागात प्रचार फेरी काढण्यात आली 




अजित तिवडे यांनी अजित फौंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत विविध प्रकारचे सेवाभावी उपक्रम राबवले आहेत . "हाकेला धावनारा" अशी भागात अजित तिवडे यांची ओळख आहे . 
युवकापासून ते जेष्ठ नागरिक यांच्यापर्यंत विविध उपक्रम माध्यमातून अजित तिवडे यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे . भागातील विविध प्रश्न शासनदरबारी मांडले आहेत. तरी आजच्या प्रचार फेरीला भागातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.


आजच्या या प्रचार फेरीत सामाजिक कार्यकर्ते मिलिंद धोंड , शेतकरी संघटनेचे राजेश नाईक , माजी नगरसेवक गौतम जाधव , रवींद्र पोवार, बाबासाहेब मिरशिकारी , अमित तितवे, विशाल सामंत , दीपक जाधव, दत्ता शिंदे, मीरा साते, रमेश आपटे आदी तसेच भागातील अबालवृद्ध उपस्थित होते.


Comments