शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस यांच्यातील चर्चा सकारात्मक जागा वाटप अंतिम टप्प्यात – सुनील मोदी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस यांच्यातील चर्चा सकारात्मक जागा वाटप अंतिम टप्प्यात – सुनील मोदी
कोल्हापूर १८ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस यांच्यात महाविकास आघाडी अंतर्गत सुरू असलेल्या जागा वाटपाच्या चर्चांना सकारात्मक दिशा मिळाली आहे. सदर चर्चा सध्या अंतिम टप्प्यात असून येत्या एक-दोन दिवसांत जागा वाटपाचा प्रश्न पूर्णतः निकाली निघेल, अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी यांनी दिली.
महाविकास आघाडी म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आम्ही एकजुटीने व ताकदीने लढणार असून जनतेच्या विश्वासावर सत्ता स्थापन करू, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचे निराकरण हेच महाविकास आघाडीचे प्रमुख उद्दिष्ट राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Comments
Post a Comment