१९ डिसेंबर रोजी एमईडीसी - एमएसएमई कॅपॅसिटी बिल्डिंग समिट २०२५ भव्य आयोजन : विविध मान्यवरांचा सहभाग
कोल्हापूर : १४ सिटी न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल, एमईडीसी व महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, मित्रा यांच्या संयुक्त विद्यमाने “एमईडीसी - एमएसएमई कॅपॅसिटी बिल्डिंग समिट २०२५ - २६” या एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन शुक्रवार, दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ ते ६ या वेळेमध्ये सयाजी हॉटेल, कवळा नाका, कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. अशी माहिती एमईडीसीचे प्रादेशिक संचालक सत्यजित भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
![]() |
| For appointment 9623895866 |
महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल, एमईडीसी ची स्थापना १९५७ साली डॉ. डी. आर. गाडगीळ यांनी केली. एमईडीसी ही महाराष्ट्र राज्यासाठी थिंक टँक, विकास प्रवर्तक तसेच गुंतवणूक सुलभ करणारी एक स्वतंत्र, निरपेक्ष व स्वायत्त संशोधन संस्था आहे. गेल्या ६७ वर्षांपासून एमईडीसी राज्य शासन, उद्योग व व्यावसायिक क्षेत्र, शिक्षणतज्ज्ञ, व्यावसायिक, बँकिंग क्षेत्र, अर्थतज्ज्ञ तसेच विविध अग्रगण्य घटकांसोबत सक्रियपणे कार्य करत आहे. राज्याच्या आर्थिक विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर धोरणात्मक अभ्यास, मार्गदर्शन व समन्वय साधणे हे एमईडीसी चे प्रमुख कार्य आहे.
महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल, एमईडीसी यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारी " एमईडीसी : एमएसएमई कॅपॅसिटी बिल्डिंग समिट २०२५ - २६" ही महाराष्ट्रभर राबविण्यात येणारी एक महत्त्वाकांक्षी राज्यस्तरीय उपक्रममालिका आहे. या उपक्रमाचा उद्देश राज्यातील प्रमुख विकास क्षेत्रांमध्ये कार्यरत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना, [एमएसएमई] सक्षम व बळकट करणे हा आहे.
ज्ञानवर्धक सत्रे, उद्योगातील ताज्या घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच परस्पर सहकार्याच्या माध्यमातून एमएसएमई उद्योगांची स्पर्धात्मक क्षमता, नवोन्मेष आणि शाश्वतता वाढविण्यावर या परिषदेमध्ये भर देण्यात येणार आहे.
या परिषदेच्या माध्यमातून धोरणकर्ते, उद्योजक, उद्योग नेते आणि तज्ज्ञ एकत्र येऊन व्यावहारिक उपाययोजना, विविध शासकीय सहाय्य योजना यांची माहिती तसेच अर्थपूर्ण व्यावसायिक संपर्क व सहकार्याच्या संधी निर्माण करतील.
मुंबई येथून प्रारंभ होणारी ही उपक्रममालिका पुढे पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या प्रमुख शहरांमध्ये आयोजित केली जाणार असून, यामाध्यमातून एमएसएमई उद्योगांच्या पुढील टप्प्यातील वाढीस व आत्मनिर्भरतेस भक्कम पाया घालण्याचा उद्देश आहे.
कोल्हापूर येथील परिषदेविषयी
कोल्हापूर आवृत्तीमध्ये या विभागातील मजबूत फाउंड्री व उत्पादन उद्योग परिसंस्था अधोरेखित करण्यात येणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य नेते, एमएसएमई उद्योजक तसेच तज्ज्ञ एकत्र येऊन तंत्रज्ञान उन्नतीकरण, स्पर्धात्मकता वाढ आणि उद्योगविकास यासाठी मार्गदर्शन व विचारमंथन करतील.
फाउंड्री उद्योगांच्या मोठ्या समूहामुळे कोल्हापूर शहराला ऑटोमोबाईल व अभियांत्रिकी पुरवठा साखळीत महत्त्वाची भूमिका लाभलेली आहे. याच पार्श्वभूमीवर, या परिषदेतील सत्रांमध्ये स्वयंचलन [ऑटोमेशन], गुणवत्ता सुधारणा, शाश्वत औद्योगिक पद्धती तसेच कौशल्य विकास या विषयांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश एमएसएमई उद्योगांची क्षमता अधिक सक्षम करणे तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेशाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
सकाळच्या सत्रात या परिषदेचे उद्घाटन श्री. अमन मित्तल, संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, मित्राआणि श्री. अमोल येडगे, जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थिती आहे.
यावेळी श्री. अतुल शिरोडकर अध्यक्ष, एमईडीसी आणि श्री. सचिन इटकर उपाध्यक्ष, एमईडीसी हे देखील मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विविध सत्रात ही परिषद होणार आहे
तांत्रिक व मार्गदर्शन सत्रे
या परिषदेतील विविध सत्रांमधून फाउंड्री व एमएसएमई उद्योगांसाठी महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
१] पहिले सत्र
फाउंड्री क्षेत्रातील नव्या संधी
समन्वयक : श्री. प्रदीप पेशकर, सदस्य, नॅशनल बोर्ड फॉर एमएसएमई, भारत सरकार
२] दुसरे सत्र
फाउंड्री उद्योगासाठी MSME क्षमता वृद्धी [ तांत्रिक कौशल्य, उत्पादकता व कार्यक्षमतेवर भर ] समन्वयक : श्री. सचिन शिरगावकर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिनर्जी ग्रीन इंडस्ट्रीज लिमिटेड.
३] तिसरे सत्र
२९९० शासकीय एमएसएमई लाभ योजनांद्वारे क्षमता वृद्धी
समन्वयक : सी.ए. योगेश कुलकर्णी, ज्येष्ठ उद्योग तज्ज्ञ
४] चौथे सत्र [दुपारनंतर] : एमपीसीबी नियमांचे पालन व दंड टाळण्यासाठी मार्गदर्शन
मार्गदर्शक : ॲड. दत्तात्रय देवळे
५] पाचवे सत्र
फाउंड्री क्षेत्रातील शाश्वत वाढ व नफा मार्गदर्शक : श्री. संभाजी पवार, माजी प्रमुख, फाउंड्री विभाग, टाटा मोटर्स लिमिटेड
या परिषदेचा समारोप हाय-टी व नेटवर्किंग सत्राने होणार आहे.
नोंदणी व संपर्क
या परिषदेची नोंदणी सुरू असून, फाउंड्री उद्योजक स्टार्टअप्स, नवउद्योजक, एमएसएमई उद्योजक आणि उद्योग व्यावसायिकांनी, व्यवस्थापन प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही आपल्या माध्यमातून करत आहोत.
📧 नोंदणीसाठी ई-मेल : medc@medcindia.com
📞 अधिक माहितीसाठी संपर्क : ९३२२३५७५६७
परिषदेची नोंदणी सुरू असून, स्टार्टअप्स, नवउद्योजक, एमएसएमई उद्योजक व उद्योग व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आजच्या पत्रकार परिषदेसाठी एमईडीसीचे प्रादेशिक संचालक कोल्हापूर - सत्यजित भोसले, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन स्मॅक चे अध्यक्ष जयदीप चौगले, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन गोशीमाचे अध्यक्ष सुनिल शेळके, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल हातकणंगले मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंडरमेन आयआयएफ कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष राहुल पाटील, इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश दाते, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे अध्यक्ष संजय शेटे, उद्योजक सचिन शिरगावकर आदी उपस्थित होते.

.jpg)
Comments
Post a Comment