अखिल भारतीय हिंदू महासभा कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत सर्वच जागा लढवणार

अखिल भारतीय हिंदू महासभा कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत सर्वच जागा लढवणार 


कोल्हापूर १९ सिटी न्यूज नेटवर्क 

अखिल भारतीय हिंदू महासभा आगामी कोल्हापूर महानगरपालिकेच्या  निवडणुकीत सर्वच जागा लढवणार असल्याची माहिती  जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरस्कर दिली.  

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी आखिल भारत हिंदू महासभा — कोल्हापूर पक्षाचे जिल्हाप्रमुख : श्री. राजेंद्र तोरस्कर ,जिल्हा प्रवक्ता : श्री. सुनील सामंत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे

आतापर्यंत विविध प्रभागातून ४० ते ४५ लोकांनी आपल्याशी संपर्क साधला आहे असेही राजेंद्र तोरस्कर यांनी इ सिटी न्यूज शी बोलताना सांगितले.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. कोल्हापूर महापालिकेत 81 जागा, तर नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महापालिकेत 65 जागांवर निवडणुका होणार आहेत 

महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत भाजप आणि शिंदेसेनेमध्ये खेचाखेची सुरू आहे. भाजपने महापौरपदासह 45 जागांवर दावा केला आहे, तर शिंदेसेनेने 33 जागांचा दावा केला आहे 


हिंदू महासभा कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत सर्वच जागा लढवणार असल्याने , या निवडणुकीचे समीकरण आणखी रोचक होणार आहे.



Comments