सतेज पाटील यांनी जाणून घेतला नागरिकांच्या मनातील जाहीरनामा
कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी
काँग्रेस जाहीरनामा करणार असून त्यासाठी नागरिकांकडून सूचना मागवण्यात येत आहेत. कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्स ! या टॅगलाईनखाली सुरु केलेल्या मोहितेंतर्गत विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी मॉर्निंग वॉकला नागरिकांशी संवाद साधत त्यांच्याकडून सूचना व समस्या जाणून घेतल्या. आमदार पाटील यांनी सकाळी महावीर गार्डन परिसर, नाना-नानी पार्क, पितळी गणपती, पोस्ट ऑफिस चौक,
आरटीओ ऑफिस या परिसरात भेट देत संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महालक्ष्मी इडली सेंटरवर जाऊन नागरिकांचे प्रश्न जाणून घेत नागरिकांसोबत चहा नाष़्ट्याचा आस्वाद घेतला. शहराच्या विकासाबद्दलच्या नागरिकांच्या भावना, संकल्पना आणि अपेक्षा जाणून घेतल्या. कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं अशी साद घालून कोल्हापूरच्या विकासाचा विश्वास आमदार पाटील यांनी नागरिकांना दिला. यावेळी हाॅटेल व्यवसायिक आनंद माने, उमेदवार अर्जुन माने, अमर समर्थ, विनायक फाळके उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून कंडका पाडायचा, आमचं ठरलं, ख़टक्यावर बोट जाग्याव पलटी अशा अनेक स्लोगन राज्यभर गाजल्या आहेत. आता कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं या मोहिमेलाही उदंड प्रतिसाद मिळत आहे.

Comments
Post a Comment