भाजपाचे नूतन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन यांना खासदार महाडिक यांनी दिल्या शुभेच्छा

 भाजपाचे नूतन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन यांना खासदार महाडिक यांनी दिल्या शुभेच्छा


कोल्हापूर १८ सिटी न्यूज नेटवर्क 

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून  श्री. नितीन नबीन जी यांची नुकतीच निवड झाली.  त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत श्री नितीन नवीन यांची भेट घेऊन, त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. 



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार लोकहिताच्या आणि देशाच्या विकासाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवत आहे. भारतीय जनता पार्टीचा जनाधार वाढत असून, नितीन नबीन यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचा अधिक विस्तार होईल, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनहिताच्या अनेक योजना महाराष्ट्रात राबवू, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. 



प्रभावी कार्यशैली, संघटनात्मक दूरदृष्टी आणि जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेल्या नेतृत्वावर भाजपाने ही जबाबदारी दिली आहे.  नबीनजी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक सक्षम आणि गतिमान होईल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. नवीन यांनीही खासदार महाडिक यांच्याशी आपुलकीने संभाषण करून,  विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

Comments