केडीसीसी बँकेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसो मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहन सोहळा संपन्न झाला.
ध्वजारोहनानंतर उपस्थितांना संबोधित करताना ना. हसनसो मुश्रीफ यांनी सहकार चळवळीचे महत्व अधोरेखित करत केडीसीसी बँकेने जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि आर्थिक विकासासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. संविधानातील मूल्ये जपत देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संतोष पाटील, संचालिका सौ. स्मिता युवराज गवळी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले असून उपस्थितांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.

Comments
Post a Comment