आजचे राशिभविष्य
🌞 बुधवार, २१ जानेवारी २०२६.
माघ शुक्ल तृतीया.
विश्वावसुनाम संवत्सर.
शके १९४७, संवत २०८२.
शिशिर ऋतू. उत्तरायण.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
(संपर्क – 8087520521)
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज संध्याकाळी ७.०० नंतर चांगला दिवस आहे”
नक्षत्र – धनिष्ठा / (दुपारी १.५८ नंतर) शततारका
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ
(व्यतिपात योग, रवी युती बुध, चंद्र केंद्र हर्षल)
२१ जानेवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये :-
तुमच्यात नेतृत्वगुण, दूरदृष्टी आणि प्रखर आत्मविश्वास असतो. तुम्ही आधुनिक विचारांचे, स्वतंत्र वृत्तीचे आणि काहीसे बंडखोर स्वभावाचे असता. समाजात वेगळा ठसा उमटवण्याची तुमची इच्छा असते. बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती हे तुमचे बलस्थान आहे.
तुम्ही भावनांपेक्षा विचारांना अधिक महत्त्व देता, त्यामुळे कधी कधी नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो. मान-सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा तुम्हाला महत्त्वाची वाटते. कल्पकता, संशोधन, तंत्रज्ञान, समाजकारण किंवा अध्यात्म या क्षेत्रात तुम्ही चमकू शकता.
आरोग्याच्या बाबतीत रक्तदाब, पायांचे विकार, स्नायू ताण याबाबत सावध राहा.
शुभ रंग – निळा.
शुभ दिवस – बुधवार, शुक्रवार, शनिवार.
शुभ अंक – ४, ७, ८.
टीप: नावाप्रमाणेच तुमची राशी असेलच असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” फेसबुक पेजला भेट द्या.
आजचे राशिभविष्य
मेष :- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
चंद्र लाभ स्थानी आहे. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. मित्रांकडून मदत मिळेल. संध्याकाळनंतर नवीन संधी चालून येतील. जोखमीची कामे टाळा.
वृषभ :- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. बोलताना संयम ठेवा.
मिथुन :- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
रवी-बुध युतीमुळे बौद्धिक कामात यश मिळेल. लेखन, शिक्षण, मीडिया क्षेत्रात लाभ होईल. प्रवासाचे योग आहेत.
कर्क :- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
मानसिक ताण जाणवू शकतो. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील. संध्याकाळनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.
सिंह :- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
भागीदारीत लाभ संभवतो. विवाह किंवा करार विषयक चर्चा पुढे सरकतील. व्यतिपात योगामुळे घाईचे निर्णय टाळा.
कन्या :- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
चंद्र षष्ठ स्थानी असल्याने आरोग्याची काळजी घ्या. स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळेल. कर्ज किंवा वाद मिटतील.
तुळ :- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
पंचम स्थानी चंद्र आहे. प्रेम, कला, सर्जनशीलता यामध्ये प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस आहे.
वृश्चिक :- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
घरगुती प्रश्न मार्गी लागतील. स्थावर मालमत्तेचे व्यवहार पुढे सरकतील. भावनिक निर्णय टाळावेत.
धनु :- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
पराक्रम वाढेल. नवीन योजना राबवण्याचा आत्मविश्वास मिळेल. भावंडांकडून सहकार्य मिळेल.
मकर :- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
चंद्र द्वितीय स्थानी आहे. आर्थिक नियोजन करा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. बोलण्यात गोडवा ठेवा.
कुंभ :- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
चंद्र तुमच्या राशीत आहे. आत्मविश्वास वाढेल. मात्र व्यतिपात योगामुळे संध्याकाळपूर्वी महत्त्वाचे निर्णय टाळा. संध्याकाळनंतर दिवस अनुकूल होईल.
मीन :- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
मन अंतर्मुख राहील. अध्यात्मिक विचार वाढतील. खर्च वाढण्याची शक्यता आहे. ध्यान-पूजन लाभदायक ठरेल.
— ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
कुंडली परीक्षणासाठी कृपया संपर्क करा.

Comments
Post a Comment