मोरेवाडीत काँग्रेस उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा

 मोरेवाडीत काँग्रेस उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त  पाठिंबा



कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर जिल्हा परिषद पंचवार्षिक पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघातील प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या मतदारसंघात काँग्रेस ने वैयक्तिक भेटी गाठी करत प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यामुळे काँग्रेसचे सर्वसामान्यात विचार रुजत आहेत. 

  जिल्हा परिषद निवडणुकीतील पाचगाव मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार श्री. संग्राम पाटील तसेच पंचायत समितीच्या उमेदवार सौ. सीमा पोवाळकर आणि उजळाईवाडी पंचायत समितीच्या उमेदवार डॉ. शिल्पा हजारे यांना मोरेवाडी परिसरातील सर्व कॉलनी  पी. डी. भोसले नगर, मोरेवाडी येथील नागरिकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

यावेळी पी. डी. भोसले नगर, मोरेवाडी येथील लोकनियुक्त सरपंच श्री. ए. व्ही. कांबळे यांच्यासह आर. बी. पाटील, आर. जी. घस्ते, गीता पाटील, नूरजहाँ बालेखान, वैशाली घाटे-गस्ते संगीता परकाळे, शोभा सनगर आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments