आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य 

 सोमवार, २६ जानेवारी २०२६




माघ शुक्ल अष्टमी.

शिशिर ऋतू. उत्तरायण.

विश्वावसुनाम संवत्सर.

शके १९४७, संवत २०८२.


राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

(संपर्क – 8087520521)


राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


“आज आनंदी दिवस आहे”

दुर्गाष्टमी, भीष्माष्टमी, गणराज्य दिन 🇮🇳


चंद्रनक्षत्र – अश्विनी / (दुपारी १२.३३ नंतर) भरणी

चंद्रराशी – मेष


करण – विष्टी

ग्रहयोग –

रवी केंद्र चंद्र,

चंद्र केंद्र बुध,

चंद्र लाभ गुरू,

चंद्र केंद्र शुक्र


२६ जानेवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये :-


तुमच्यावर मंगळ, सूर्य व चंद्र या ग्रहांचा प्रभाव असतो. तुम्ही धाडसी, स्पष्टवक्ते आणि नेतृत्वगुण असलेले व्यक्तिमत्व आहात. राष्ट्रप्रेम, शिस्त आणि कर्तव्यभावना तुमच्यात ठासून भरलेली असते.

तुम्ही आव्हाने स्वीकारणारे, आत्मविश्वासी व कृतीशील असता. कधी कधी उतावळेपणा जाणवतो, मात्र निर्णयक्षमतेमुळे तुम्ही परिस्थिती सांभाळता.

प्रशासन, संरक्षण, क्रीडा, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, राजकारण किंवा स्वयंरोजगार क्षेत्रात यश मिळते.


शुभ दिवस : मंगळवार, रविवार

शुभ रंग : लाल, केशरी

शुभ रत्ने : मूंगा, माणिक

(रत्ने घेताना कुंडलीचा उपयोग अवश्य करा)


राशिभविष्य


मेष


(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

आज चंद्र तुमच्याच राशीत आहे. आत्मविश्वास प्रचंड वाढेल. नवीन कामाची सुरुवात करण्यास उत्तम दिवस. मान-सन्मान मिळेल. उतावळेपणा टाळा.


वृषभ


(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

खर्च वाढण्याची शक्यता आहे. मात्र आवश्यक गोष्टींवर केलेला खर्च समाधान देईल. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल.


मिथुन


(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

संवाद कौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. मित्रांशी भेटीगाठी होतील. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट बोला.


कर्क


(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

मन थोडे अस्वस्थ राहील. भावनिक निर्णय टाळावेत. ध्यान, प्रार्थना किंवा संगीत मनाला शांती देईल.


सिंह


(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

करिअरच्या दृष्टीने चांगला दिवस. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. अधिकाराचा योग्य वापर करा.


कन्या


(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. आर्थिक नियोजनासाठी योग्य दिवस. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.


तुळ


(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. प्रेमसंबंधात मधुरता राहील.


वृश्चिक


(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

संमिश्र दिवस आहे. मनातील गुपिते उघड करू नका. संयम ठेवल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल.


धनु


(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

भाग्याची साथ मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक व आध्यात्मिक कार्यात मन रमेल.


मकर


(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

कामात स्थिरता येईल. जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातून समाधान मिळेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.


कुंभ


(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

आर्थिक व्यवहार सावधपणे करा. अचानक खर्च संभवतो. मित्रांशी वाद टाळा.


मीन


(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

आज मन प्रसन्न राहील. सर्जनशील कामात यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.


— ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

📞 8087520521


कुंडलीवरून करिअर, विवाह, व्यवसाय, भागीदारी, आरोग्य, भाग्योदय, शुभ रत्ने व सविस्तर मार्गदर्शन अल्प किमतीत जाणून घेण्यासाठी संपर्क करा.

Comments