ग्रामीण विकासाचा नवा फॉर्म्युला; पाडळी खुर्दमध्ये डॉ. के. एन. पाटील यांची दमदार एन्ट्री
कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत पाडळी खुर्द मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने डॉ. के. एन. पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर होताच कोगे परिसरात काँग्रेसकडून प्रचाराचा धडाका सुरू झाला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. के. एन. पाटील यांनी ग्रामीण विकासाचा “के. एन. पॅटर्न” राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिला बचत गट, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, तसेच शेतीपूरक व्यवसायांना चालना देणे हा या विकास मॉडेलचा मुख्य केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रचारादरम्यान डॉ. पाटील यांनी घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधत विकासाचा अजेंडा मांडला. “राजकारणापेक्षा जनतेच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत सर्वसमावेशक विकास साधला जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होत असून पाडळी खुर्द मतदारसंघात काँग्रेसला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
ग्रामीण विकासाचा ठोस आराखडा आणि अनुभवाच्या जोरावर डॉ. के. एन. पाटील यांची उमेदवारी मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत असून निवडणुकीत रंगत वाढली आहे


Comments
Post a Comment