कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा मनु मय पांचाल समाज सेवा संस्थेतर्फे उजळाईवाडीत श्री विश्वकर्मा महोत्सव उत्साहात साजरा
कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा मनु मय पांचाल समाज सेवा संस्थेतर्फे उजळाईवाडीत श्री विश्वकर्मा महोत्सव उत्साहात साजरा
कोल्हापूर ३१ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा मनु मय पांचाल समाज सेवा संस्था, उजळाईवाडी (ता. करवीर) यांच्यावतीने विश्वकर्मा महोत्सव भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आद्य देव श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास अध्यक्ष श्री. एन. जी. निटुरकर, उपाध्यक्ष श्री. आर. एल. सुतार, कार्याध्यक्ष श्री. आर. डी. लोहार, सेक्रेटरी श्री. पांडुरंग जी. सुतार, व्हि डी लोहार , मारुती लोहार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच श्री विश्वकर्मा (लोहार-सुतार) सहकारी गृहनिर्माण संस्था, विश्वकर्मानगर, उजळाईवाडी यांचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात पारंपरिक पूजन, आरती व समाजबांधवांचा सहभाग लाभला. समाजातील एकोपा, सांस्कृतिक परंपरा जपण्याचे महत्त्व आणि सामाजिक बांधिलकी यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. युवकांनी शिक्षणासोबतच समाजकार्यामध्ये पुढाकार घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ सर्वच समाज बांधव यांनी घेतला.
विश्वकर्मा महोत्सवाच्या निमित्ताने समाजातील विविध घटक एकत्र आल्याने कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण लाभले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments
Post a Comment