पाचगाव जिल्हा परिषद निवडणूक : मोरेवाडी परिसरात काँग्रेसचा जोरदार प्रचार सुरू

 पाचगाव जिल्हा परिषद निवडणूक : मोरेवाडी परिसरात काँग्रेसचा जोरदार प्रचार सुरू



कोल्हापूर २८ सिटी न्यूज नेटवर्क 

पाचगाव (ता. करवीर) येथील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा प्रचार आता वेग घेत असून मोरेवाडी परिसरात घरोघरी संपर्क, बैठका व प्रचार फेऱ्यांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मोरेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच आनंदा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते सक्रिय झाले असून ग्रामपंचायत सदस्य आशिष शरदराव पाटील, श्रेयस कोरवी, सुदर्शन पाटील, रविकरण देसाई, संदीप पाटणकर, नारायण गाडगीळ, नरेंद्र नीरसेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात आघाडीवर आहेत.

या प्रचारात अष्टविनायक पार्क, तिरुपती पार्क, भोसले नगर, बापू पार्क, भारती नगर आदी परिसरांमध्ये मतदारांशी थेट संवाद साधण्यात येत असून काँग्रेसच्या धोरणांची माहिती देत विकासकामांचा लेखाजोखा मांडला जात आहे.

स्थानिक प्रश्न, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मुद्द्यांवर भर देत काँग्रेसकडून विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. “पाचगाव परिसराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे,” असे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Comments