पश्चिम महाराष्ट्रातील भव्य बांधकाम व वास्तु विषयक प्रदर्शन ‘दालन २०२६’ ३० जानेवारीपासून सुरू
कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क
पश्चिम महाराष्ट्रातील वास्तुविषयक , बांधकाम व्यावसायिक, गृहखरेदीदार तसेच रिअल इस्टेट क्षेत्राशी निगडित सर्व घटकांसाठी महत्त्वाचे ठरणारे भव्य वास्तुविषयक प्रदर्शन ‘दालन २०२६’ येत्या ३० जानेवारीपासून सुरू होत असून ते २ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत क्रीडाई (KREDAI) चे अध्यक्ष के. पी. खोत यांनी दिली. सदर प्रदर्शन ४ दिवस सकाळी १० ते ८ या कालावधीत सुरू राहणार आहे.
या पत्रकार परिषदेला प्रसिद्ध अभिनेत्री व क्रीडाईची ब्रँड ॲम्बेसेडर प्रार्थना बेहरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना के. पी. खोत यांनी सांगितले की, ‘दालन २०२६’ हे केवळ प्रदर्शन नसून वास्तु, बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील नव्या संकल्पना, आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत बांधकाम पद्धती आणि ग्राहकांसाठी उपयुक्त पर्याय एकाच छताखाली मांडणारे व्यासपीठ आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी यावेळी बोलताना गृहखरेदी करताना दर्जा, विश्वासार्हता आणि नियोजनबद्ध विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. क्रीडाईच्या माध्यमातून ग्राहकांना सुरक्षित व पारदर्शक पर्याय मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘दालन २०२६’ मध्ये नामवंत बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद, इंटेरियर डिझायनर्स, गृहसजावट, बांधकाम साहित्य, स्मार्ट होम तंत्रज्ञान आदी क्षेत्रांतील विविध स्टॉल्स असणार असून, नागरिकांना घरखरेदी व गुंतवणुकीसाठी एक उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वास्तु क्षेत्राला नवी दिशा देणारे हे प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या पत्रकार परिषदेला किडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोल, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, उपाध्यक्ष चेतन वसा, सचिव गणेश सावंत, खजानिस अजय डोईजड, दालनचे चेअरमन महेश यादव, व्हाईस चेअरमन आदित्य वेडेकर, समन्वयक निखिल शहा, सचिव संग्राम दळवी, खजानिस अमोल देशपांडे सह समन्वयक पवन जामदार, सह सचिव शौर्य मगदूम, सह खजानिस लव पटेल, विझनेस प्रमोशन कमीटी चेअरमन गौतम परमार, ग्राऊंड कमिटी चेअरमन श्रीकांत पाटील,
होर्डिंग कमिटी चेअरमन श्रीराम पाटील, पब्लिक रिलेशन कमिटी प्रतिक होसमनी, प्रिटींग डिझाईन कमिटी चेअरमन विजय माणगांवकर हॉस्पिटीलीटी कमिटी चेअरमन केतन शहा, इनॉग्रेशन कमिटी चेअरमन बलराज पाटील, सोविनियर कमिटी चेअरमन संदिप बोरचाटे, स्टॉल अलोकेशन कमिटी चेअरमन तुषार बेर्डे, रजिस्ट्रेशन कमिटी चेअरमन योगेश आटले तसेच किडाईचे महमचिव नंदकुमार पाटील, सहखजानिस सागर नालंग, संचालक सचिन ओसवाल, प्रदिप भारमल, चेतन चव्हाण, संदिप पोवार, बीकांत पाटील, अतुल पोवार व मौक्तिक पाटील हजर होते सचिव गणेश सावंत यांनी सद्यत्ति आभार मानले.

Comments
Post a Comment