आजचे राशिभविष्य
रविवार, २५ जानेवारी २०२६
माघ शुक्ल सप्तमी.
शिशिर ऋतू. उत्तरायण.
विश्वावसुनाम संवत्सर.
शके १९४७, संवत २०८२.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
(संपर्क – 8087520521)
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज उत्तम दिवस आहे”
भानू सप्तमी, रथ सप्तमी
चंद्रनक्षत्र – रेवती / (दुपारी १.३६ नंतर) अश्विनी
चंद्रराशी – मीन / (दुपारी १.३६ नंतर) मेष
ग्रहयोग – चंद्र केंद्र मंगल
मेष
(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आज आत्मविश्वास वाढलेला असेल. नवीन कामाची सुरुवात करण्यास उत्तम दिवस आहे. अधिकारपदावरील व्यक्तींशी चर्चा फलदायी ठरेल. प्रवासाचे योग संभवतात. उत्साह टिकवून ठेवा.
वृषभ
(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
चंद्र लाभस्थानी असल्याने आर्थिक बाबतीत समाधान मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. जुन्या ओळखींकडून मदत मिळेल. खर्च नियंत्रणात ठेवा.
मिथुन
(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
कामाचा ताण वाढू शकतो, मात्र नियोजन केल्यास यश मिळेल. नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा दिवस आहे. संवाद कौशल्यामुळे अडचणी सुटतील.
कर्क
(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
मन काहीसे अस्थिर राहू शकते. भावनिक निर्णय टाळावेत. कुटुंबीयांसोबत वेळ घालविल्यास मनःशांती मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह
(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
आज तुमचे नेतृत्वगुण दिसून येतील. जबाबदारी वाढेल, पण त्यातून प्रतिष्ठा मिळेल. वाहन चालविताना काळजी घ्या. खर्च विचारपूर्वक करा.
कन्या
(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसाय व नोकरीत प्रगती दिसेल. तुमचा सल्ला इतरांना उपयोगी ठरेल. जोडीदाराशी सुसंवाद साधाल.
तुळ
(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात संपर्क वाढतील. आज केलेली गुंतवणूक भविष्यात लाभदायक ठरू शकते. आवडत्या व्यक्तीसाठी वेळ काढाल.
वृश्चिक
(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
चंद्र पंचमस्थानी असल्याने आनंददायी घटना घडतील. संततीविषयक विचार मनात येतील. प्रतिष्ठा जपण्याची गरज आहे. बोलण्यात संयम ठेवा.
धनु
(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागेल. मोठे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. अध्यात्मिक किंवा धार्मिक कार्यात मन रमू शकते.
मकर
(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
व्यवसायासाठी उत्तम दिवस आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. सूर्य उपासना लाभदायक ठरेल.
कुंभ
(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
साडेसातीचा प्रभाव जाणवेल. बोलण्यात मोजकेपणा ठेवा. आर्थिक व्यवहार सावधपणे करा. राहू उपासना मनाला स्थैर्य देईल.
मीन
(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
चंद्र अनुकूल असल्याने आजचा दिवस सकारात्मक आहे. नवीन संधी प्राप्त होतील. दीर्घकालीन नियोजन करण्यास योग्य वेळ आहे. घरातील वाद टाळा.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
— ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📞 8087520521

Comments
Post a Comment