चित्रपट निर्मितीचा ध्यास बाळगा – रणजित जाधव
चित्रपट महामंडळाला शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची भेट
![]() |
- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कोल्हापूर येथील कार्यालयाला शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करताना रणजित जाधव. शेजारी बाबासाहेब खाडे, रवींद्र बोरगावकर, सतीश बिडकर, अनुप जत्राटकर आदी.
कोल्हापूर, ता. ८ सिटी न्यूज नेटवर्क
चित्रपट निर्मिता होऊन चित्रपट निर्मितीचा ध्यास बाळगा, असा आशावाद संचालक रणजित जाधव यांनी व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन आणि बी.ए. फिल्म मेकिंग विभागातील विद्यार्थ्यांनी येथील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ कार्यालयाला अभ्यास भेट दिली. त्यावेळी श्री. जाधव बोलत होते.
या अभ्यास भेटीचा मुख्य उद्देश मराठी चित्रपटसृष्टीची कार्यपद्धती, संस्थात्मक रचना तसेच चित्रपट निर्मितीतील व्यावसायिक आणि संघटनात्मक पैलू समजून घेणे होता. ते म्हणाले, चित्रपट निर्मिती करा पण त्यासाठी निर्मिती प्रक्रियेतील प्रत्येक घटकाचा अभ्यास करा. त्याची माहिती घ्या आणि कलात्मक अशी निर्मिती करा.
महामंडळाचा इतिहास, स्थापना, उद्दिष्टे आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासातील योगदान याबाबत सविस्तर याचबरोबर कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते व दिग्दर्शक यांच्या हक्कांसाठी महामंडळाची भूमिका, चित्रपट उद्योगातील शिस्त व नियमावली याविषयी जाधव यांनी मार्गदर्शन केले.
संचालक व कला दिग्दर्शक सतीश बिडकर यांनीही बहुमोल असे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, चित्रपटसृष्टीत आता आमची तिसरी पिढी आहे. यशाचे शिखर गाठायचे आहे तर झोकून देऊन काम करा. यश आपलेच आहे.
व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर यांनी स्वागत केले. त्यांनी चित्रपट निर्मितीतील आव्हाने, सध्याच्या मराठी चित्रपटसृष्टीची परिस्थिती आणि भविष्यातील संधी यावर भाष्य केले.
फिल्म मेकिंगचे सहयोगी शिक्षक बाबासाहेब खाडे यांनी प्रास्ताविक केले. अनुप जत्राटकर यांनी आभार मानले. यावेळी नम्रता गोडबोले, सिद्धेश मंगेशकर, मास कम्युनिकेशन, फिल्म मेकिंगचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामंजस्य करार करू
चित्रपट महामंडळ, चित्रनगरी व शिवाजी विद्यापीठामध्ये लवकरच सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबर चित्रीकरणाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना माहिती होण्यासाठी लवकरच शासन, पदाधिकाऱ्यांच्या माध्यामातून प्रयत्न करू, असे आश्वासनही जाधव व बिडकर यांनी यावेळी दिले.

Comments
Post a Comment