आजचे राशिभविष्य

 आजचे राशिभविष्य 

मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६.





माघ कृष्ण अष्टमी. शके १९४७, संवत २०८२.

शिशिर ऋतू. उत्तरायण.

विश्वावसुनाम संवत्सर.


राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

(संपर्क – 8087520521)


राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०


आज वर्ज्य दिवस आहे. काळाष्टमी. 


चंद्रनक्षत्र – विशाखा.

आज जन्मलेल्या बाळाची राशी – तूळ.


आजचे ग्रहयोग:

☀️ रवी केंद्र चंद्र – आत्मविश्वास, प्रतिष्ठा वाढ

🌙 चंद्र त्रिकोण गुरू – धार्मिक आणि अध्यात्मिक.



मेष


(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

आज पत्नीची किंवा जोडीदाराची विशेष साथ मिळू शकते. व्यवसाय वाढ होईल. नैतिक अधिष्ठाने वाढेल. शत्रू पराभूत होतील.


वृषभ


(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

व्यवसाय वाढीसाठी उत्तम ग्रहमान आहे. नवनवीन संधी चालून येतील. सरकारी कामात मात्र दिरंगाई अनुभवास येईल. पित्याशी मतभेद संभवतात.


मिथुन


(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

आज संतती बाबत विशेष शुभ घटना घडतील. परदेश गांनाचे योग आहेत किंवा दूरचे प्रवास होतील. मात्र सूर्याची अनुकूलता नाही. मोठी जोखीम घेऊ नका. हाडांची काळजी घ्या.

 

कर्क


(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

आर्थिक स्थैर्य जाणवेल. घरगुती कामासाठी आज खर्च करावा लागेल. मात्र अंतिमतः ते तुमच्या हिताचे असेल. शत्रू आज शिरजोर होणार आहेत. अनामिक भय दाटून येईल.


सिंह


(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

व्यावसायिक कामासाठी उत्तम ग्रहमान आहे. आज व्यवसायात भरघोस वाढ संभवते. अनुकूल गुरू तुम्ही स्वप्ने साकार करतील. मन प्रसन्न राहील. प्रशासकीय कामे मात्र पुढे ढकलावी लागतील.


कन्या


(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

वारसा हक्काचे काम आज प्रगती पथावर राहील. धन धान्य आणि संपत्ती वाढेल. काही महत्वाचे निर्णय आज घ्यावे लागतील. अति धाडस नको.


तूळ


(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. मन आनंदी असणार आहे. प्रवासाचे बेत आखले जातील. जप - जाप्य केल्यास उत्तम फळ मिळेल. धार्मिक पर्यटन घडेल. घरगुती कलह टाळा.


वृश्चिक


(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

ग्रहमान संमिश्र असले तरी आज तुमचे कमेमार्गी अलगंर आहे. थोडा खर्च वाढेल मात्र तो योग्य कारणासाठी आहे. नवीन ओळखी होतील.


धनु


(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

आज उत्तम ग्रहमान आहे. त्याचा आनंद आणि लाभ घ्या. मनासारखी कामे होतील. अनुकूल चंद्र तुमचा उत्साह वाढवेन. मात्र पित्याशी मतभेद संभवतात.  


मकर


(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

आज कामाचा निपटारा करण्याचा दिवस आहे. साचलेली कामे आज पूर्ण करा. तुमच्या राशीतील रवी तुम्हाला महत्वाकांक्षा देईन. तुमच्या विचारांना बळकटी मिळेल.


कुंभ


(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

नवम स्थानी चंद्र आहे. त्याचा गुरुशी शुभ योग आहे. पंचम गुरू तुम्हाला आनंद आणि समाधान देईन. संतती कडून चांगली बातमी समजेल. दूरचे प्रवास घडतील. रवीची नाराजी आहे. सूर्यनमस्कार घालावेत. सूर्याला अर्घ्य द्या. 


मीन


(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

अष्टम स्थानी चंद्र असला तरी आज कामे मार्गी लागतील. थोडा अधिक संघर्ष करावा लागेल. मात्र आज प्रगती साध्य करणारा दिवस आहे. अनुकूल रवी शासकीय पातळीवर तुम्हाला नावलौकिक मिळवून देईन.


– सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.


व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, पती-पत्नी गुण, स्वभाव, भाग्योदय, आजार, शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या.

कुंडली परीक्षणासाठी संपर्क करा – 8087520521

Comments