प्रचाराच्या धावपळीनंतर आजचा थांबा; मतदानादिवशी अमर जत्राटेंनी कार्यकर्त्यांसोबत घेतले साधे जेवण


प्रचाराच्या धावपळीनंतर आजचा थांबा; मतदानादिवशी अमर जत्राटेंनी कार्यकर्त्यांसोबत घेतले साधे जेवण


कोल्हापूर ०७ सिटी न्यूज नेटवर्क 

गेल्या महिनाभर प्रचाराच्या धावपळीत क्षणभरही उसंत न मिळालेल्या शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपाचे अधिकृत उमेदवार अमर जत्राटे यांनी आज मतदानादिवशी दुपारच्या वेळात थोडा विराम घेतला. प्रचाराच्या रणधुमाळीत सतत जनतेत राहिलेल्या जत्राटेंनी आज कार्यकर्त्यांसोबत एकत्र बसून दुपारचे जेवण केले.

मतदानाच्या तणावपूर्ण दिवशी कोणताही गाजावाजा न करता, साधेपणाने कार्यकर्त्यांशी संवाद साधत घेतलेले हे जेवण कार्यकर्त्यांसाठी भावनिक क्षण ठरले. “प्रचारात जशी साथ दिली, तशीच आजही तुम्ही सोबत आहात,” असे म्हणत अमर जत्राटेंनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.

महिनाभर चाललेल्या प्रचारात ऊन–पावसाची पर्वा न करता रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांबरोबरचा हा निवांत क्षण नेतृत्वातील आपुलकी आणि संघटनातील एकजूट दाखवणारा ठरला. मतदान संपल्यानंतर निकालाची उत्सुकता असतानाच, आजचा हा साधा पण अर्थपूर्ण प्रसंग शिंगणापूर मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला आहे.


Comments