आजचे राशिभविष्य
सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६
. माघ कृष्ण चतुर्दशी. शिशिर ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र - श्रवण / (रात्री ८.४८ नंतर) धनिष्ठा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर. (वरीया योग, शकुनी आणि चतुष्पाद करण अशुभ आहे)
आज वर्ज्य दिवस आहे.
ग्रहस्थिती - रवी केंद्र हर्षल, चंद्र युती मंगळ, बुध त्रिकोण गुरू.
१६ फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमचा स्वभाव मिश्किल असून छोट्या छोट्या गोष्टींवर देखील तुम्ही मनमुराद हसून दाद देत असतात. तुम्ही भावनाशील आहात आणि मोकळ्या मनाचे आहात. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी मात्र कायम चालू असतात. बारीकसारीक गोष्टींवरून तुमचं मन चटकन अस्वस्थ होतं. मात्र तुम्ही लवकर सावरतात. तुमच्या मनात सतत काही ना काही चिंता लागून राहिलेली असते. तुमच्या आयुष्यात आणि रोजच्या दैनंदिन कामात इतरांची लुडबूड तुम्हाला सहन होत नाही. काही वेळेला चटकन निर्णय घेणे तुम्हाला जमत नाही. तुम्ही नम्र असून तुमच्यामध्ये अहंकार नसतो. जीवनातील बारीकसारीक आणि सूक्ष्म गोष्टींचा आढावा घेण्याकडे तुमचा कल असतो. तुम्हाला काल्पनिक रहस्यकथा देखील आवडतात आणि वैज्ञानिक कथा देखील आवडतात. तुम्ही शांतताप्रिय आणि कायदा प्रेमी आहात. कायदा मोडणाऱ्या लोकांबद्दल तुम्हाला राग असतो. तुम्हाला आराम करण्याची सवय असून अति कष्टाची कामे तुम्हाला आवडत नाहीत. तुम्ही सतत सावध असतात. लोकांना आकर्षित करण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे.
"आज संयम आणि सावधगिरी महत्त्वाची आहे."
मेष:- खर्च वाढण्याची शक्यता आहे. चंद्र-मंगळ युतीमुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवा. गुप्त शत्रू सक्रिय होतील. धार्मिक कार्यात मन लागेल.
वृषभ:- भाग्य स्थानी चंद्र असल्यामुळे आर्थिक लाभ होतील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. मात्र वर्ज्य दिवस असल्याने मोठे व्यवहार टाळावेत. जोडीदारासोबत मतभेद संभवतात.
मिथुन:- अष्टमस्थानी चंद्र आहे. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. बुध-गुरू त्रिकोणामुळे बौद्धिक कार्यात यश मिळेल. प्रवास टाळावा.
कर्क:- सप्तम स्थानी चंद्र आहे. जोडीदारासोबत मतभेद टाळा. भागीदारीत सावधगिरी बाळगा. बुध-गुरू योगामुळे सल्लामसलत करून निर्णय घ्या. कोर्ट प्रकरणात दिलासा मिळेल.
सिंह:- षष्ठ चंद्र आहे. आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना दक्षता बाळगा. गुप्त लाभ होऊ शकतो. संशोधनात्मक कार्यात यश मिळेल.
कन्या:- पंचमस्थानी चंद्र आहे. संततीकडून आनंद मिळेल. शेअर्स व सट्टा व्यवहारात सावधगिरी बाळगा. प्रेमप्रकरणात यश मिळेल. आध्यात्मिक लाभ होतील.
तुळ:- चतुर्थ स्थानी चंद्र आहे. शत्रूंवर विजय मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल. नोकरीत समाधान लाभेल. मात्र मानसिक ताण जाणवेल.
वृश्चिक:- तृतीय स्थानी चंद्र असल्यामुळे उद्योग/व्यवसायात प्रगती साध्य होईल. मात्र सरकारी कामात दिरंगाई जाणवेल. राशीस्वामी खुश असल्याने तुमचा दबदबा वाढेल.
धनु:- धन स्थानी चंद्र आहे. घरगुती वातावरणात तणाव संभवतो. मालमत्ता विषयक निर्णय पुढे ढकलावेत. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहन विषयक खर्च संभवतो.
मकर:- तुमच्या राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल, पण रागावर नियंत्रण आवश्यक आहे. दैनंदिन कामात गती येईल. मंगळाच्या प्रभावामुळे निर्णय घाईत घेऊ नका.
कुंभ:- द्वादश चंद्र आहे. खर्च वाढेल. परदेशी संबंधातून लाभ संभवतो. गुप्त व्यवहारात सावधगिरी बाळगा. ध्यान-धारणा केल्यास मन:शांती लाभेल.
मीन:- लाभ स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. नवीन मित्र जोडले जातील. मोठे व्यवहार करण्यास संध्याकाळनंतरचा वेळ चांगला आहे. आत्मविश्वास वाढेल.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments
Post a Comment