ग्रँडमास्टर श्रीराम झा यांचे अजिंक्यपदावर नाव कोरले; भाऊसाहेब देशपांडे स्मृती जलद बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न
ग्रँडमास्टर श्रीराम झा यांचे अजिंक्यपदावर नाव कोरले; भाऊसाहेब देशपांडे स्मृती जलद बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न
कोल्हापूर, दि. १७ सिटी न्यूज नेटवर्क
जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व चेस असोसिएशन कोल्हापूर यांच्या मान्यतेने विझार्ड चेस क्लब यांच्या वतीने आयोजित तृतीय भाऊसाहेब देशपांडे स्मृती व पहिल्या खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन जलद बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धा राजारामपुरी येथील इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन येथे पार पडल्या.
अंतिम नवव्या फेरीनंतर आयुर्विमा महामंडळ, दिल्लीचे ग्रँडमास्टर श्रीराम झा यांनी ८ गुण व ५५ टायब्रेक गुणांसह अजिंक्यपद पटकावले. त्यांना रोख २१ हजार रुपये व भव्य चषक देऊन गौरविण्यात आले.
अकरावा मानांकित साताऱ्याचा अनिकेत बापट याने ८ गुण व साडेचोपन्न टायब्रेक गुणांसह उपविजेतेपद मिळवत रोख १५ हजार रुपये व चषक पटकावला.
द्वितीय मानांकित पुण्याचा आंतरराष्ट्रीय मास्टर निखिल दीक्षित याने ८ गुण व साडेबावन्न टायब्रेक गुणांसह तृतीय स्थान निश्चित केले. त्याला रोख १० हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
तृतीय मानांकित कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे याने ८ गुण व ५१ टायब्रेक गुणांसह चतुर्थ स्थान मिळवले (रोख ८ हजार रुपये). तर पुण्याचा श्लोक शरणार्थी साडेसात गुणांसह पाचव्या स्थानावर राहिला (रोख ६ हजार रुपये).
बक्षीस समारंभात मान्यवरांची उपस्थिती
बक्षीस समारंभ श्रद्धा बडे, उद्योगपती प्रविण शहा, प्रतिमा गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी श्रीपाद वैद्य, कुंदा वैद्य, अमोल देशपांडे, धीरज वैद्य, सुरज वैद्य, अमृता देशपांडे, अश्विनी वैद्य, प्रसाद कुलकर्णी, अस्मिता कुलकर्णी, दीपा कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, पौर्णिमा उपळाविकर-माने, फिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारुलकर, आरती मोदी, आदित्य आळतेकर व करण परीट आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय माने यांनी केले.
स्पर्धेची वैशिष्ट्ये
पहिल्या सहा पटांवर इलेक्ट्रॉनिक बुद्धिबळ पटांचा वापर
सामने थेट ऑनलाईन प्रक्षेपित
पालक व प्रेक्षकांसाठी एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणाची सोय (संजय इलेक्ट्रॉनिक्स)
सर्व खेळाडू व पालकांसाठी मोफत चहा व भोजन व्यवस्था
प्रमुख गटांतील विजेते
मुख्य बक्षिसे (६ ते ३० क्रमांक)
ओम लमकाने (पुणे), ऋषिकेश कबनूरकर (कोल्हापूर), प्रथमेश शेर्ला (पुणे), प्रणव पाटील (कोल्हापूर), सोहम खासबारदार (कोल्हापूर) आदींसह एकूण २५ खेळाडूंना गौरविण्यात आले.
साठ वर्षांवरील उत्कृष्ट खेळाडू : बी.एस. नाईक (कोल्हापूर) प्रथम.
उत्कृष्ट महिला खेळाडू : संस्कृती सुतार (नांदणी) प्रथम.
उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू : यश गोगटे (रत्नागिरी) प्रथम.
२००० खालील गुणांकन : विवान सोनी (इचलकरंजी) प्रथम.
१६०० खालील गुणांकन : अथर्व चौगुले (सांगली) प्रथम.
बिगर गुणांकन : अनिरुद्ध रुईकर (कोल्हापूर) प्रथम.
१६ वर्षाखालील : अर्णव शेडगे (सांगली) प्रथम.
१४ वर्षाखालील : अभय भोसले (जांभळी) प्रथम.
१२ वर्षाखालील : तिर्थ कोद्रे (पुणे) प्रथम.
१० वर्षाखालील : अद्वैत जोशी (बेळगाव) प्रथम.
८ वर्षाखालील : अद्वैत कुलकर्णी (कोल्हापूर) प्रथम.
कोल्हापुरातील उत्कृष्ट खेळाडू : मानस महाडेश्वर प्रथम.
उत्कृष्ट अकॅडमी/क्लब : विझार्ड चेस क्लब प्रथम, के.पी. चेस अकॅडमी द्वितीय, अनया चेस क्लब तृतीय.
ही स्पर्धा कोल्हापूरच्या बुद्धिबळ विश्वासाठी अभिमानास्पद ठरली असून राज्यभरातून तसेच देशभरातील नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतल्याने स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला. आयोजकांनी उत्तम नियोजन आणि खेळाडू-पालकांसाठी केलेल्या सुविधांमुळे स्पर्धेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment