आजचे राशिभविष्य
सोमवार, २ फेब्रुवारी २०२६
माघ कृष्ण प्रतिपदा.
शिशिर ऋतू. उत्तरायण.
विश्वावसुनाम संवत्सर.
शके १९४७, संवत २०८२.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
(संपर्क – 8087520521)
⏰ राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज चांगला दिवस आहे”
🌙 चंद्रनक्षत्र – आश्लेषा / (रात्री १०.४८ नंतर) मघा
🌙 चंद्रराशी – कर्क / सिंह
✨ ग्रहयोग –
चंद्र प्रतियुती बुध,
चंद्र प्रतियुती शुक्र,
चंद्र केंद्र हर्षल
२ फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये :-
तुमच्यावर चंद्र, बुध व शुक्र या ग्रहांचा प्रभाव असतो. तुम्ही संवेदनशील, बुद्धिमान व कलाप्रेमी स्वभावाचे असता. संवादकौशल्य, कल्पकता व सौंदर्यदृष्टी हे तुमचे बलस्थान आहे.
लोकांशी पटकन जुळवून घेण्याची क्षमता तुमच्यात असते. कधी कधी भावनिक अस्थिरता जाणवते, पण समजूतदारपणा व तारतम्यामुळे तुम्ही परिस्थिती सांभाळता.
लेखन, शिक्षण, मीडिया, कला, संगीत, डिझाईन, समुपदेशन, व्यापार किंवा सेवा क्षेत्रात यश मिळते.
शुभ दिवस : सोमवार, शुक्रवार
शुभ रंग : पांढरा, फिकट गुलाबी, हिरवा
शुभ रत्ने : मोती, पाचू, हिरा
(रत्ने घेताना कुंडलीचा उपयोग अवश्य करा)
🌟 राशिभविष्य
मेष
(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आज मन प्रसन्न राहील. कामात उत्साह दिसून येईल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. घाईघाईचे निर्णय टाळा.
वृषभ
(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
आर्थिक बाबतीत विचारपूर्वक पावले उचला. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या.
मिथुन
(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
संवादातून लाभ होईल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. प्रवासाचे योग संभवतात.
कर्क
(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
चंद्र तुमच्याच राशीत असल्याने भावनांना उधाण येऊ शकते. संयम ठेवा. घरगुती विषयात समाधान मिळेल.
सिंह
(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
कामात स्थिरता येईल. आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. संध्याकाळनंतर दिवस अधिक अनुकूल.
कन्या
(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
नियोजनबद्ध कामातून यश मिळेल. आर्थिक बाबी मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या.
तुळ
(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
प्रेमसंबंधात मधुरता राहील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. कला व सौंदर्याशी संबंधित कामे यशस्वी ठरतील.
वृश्चिक
(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
मन थोडे अस्वस्थ राहू शकते. गुपिते जपून ठेवा. संयम ठेवल्यास परिस्थिती अनुकूल बनेल.
धनु
(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भाग्याची साथ मिळेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात मन रमेल. प्रवास सुखद ठरेल.
मकर
(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातून समाधान मिळेल. कामात प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
कुंभ
(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
आर्थिक व्यवहार करताना सावध रहा. मित्रांशी संवादात स्पष्टता ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मीन
(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
आज सर्जनशीलतेला वाव मिळेल. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक आनंद वाढेल.
— ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📞 8087520521
कुंडलीवरून करिअर, विवाह, व्यवसाय, भागीदारी, आरोग्य, भाग्योदय, शुभ रत्ने व सविस्तर मार्गदर्शन अल्प किमतीत जाणून घेण्यासाठी संपर्क करा.

Comments
Post a Comment