कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर; २० फेब्रुवारीला भव्य सोहळा
कोल्हापूर, दि. १७ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक व व्यावसायिकांची प्रतिनिधिक शिखर संघटना असलेल्या कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे दरवर्षी दिले जाणारे मानाचे पुरस्कार यंदाही जाहीर करण्यात आले आहेत. उद्योग व व्यापार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान या सोहळ्यात केला जाणार आहे.
२०१८ पासून सुरू असलेल्या या गौरवपरंपरेत शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योजकांना आणि समाजाभिमुख व्यापाऱ्यांना सन्मानित करण्यात येते.
यंदाचे पुरस्कार विजेते
🔹 कै. शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार
श्री. सुनित चिनुभाई परीख (असोसिएटेड डिझायनर्स व सूरज गॅस एजन्सीज)
🔹 कै. परशुराम उर्फ बापूसाहेब जाधव उद्योग पुरस्कार
श्रीमती नलिनी व्ही. नेने (मेटाफोर सिन्थेसिस)
🔹 कै. वर्धीमाई परीख व्यापार पुरस्कार
श्री. विवेक शिवरुद्र शेटे
🔹 कै. आमदार चंद्रकांत जाधव नव व्यापार-उद्योग पुरस्कार
श्री. दुर्गेश बळवंत तोडकर (डीटी असोसिएट्स)
श्री. प्रताप भगवान पाटील (वॉलस्टार टेक्नॉलॉजीज प्रा. लि.)
विशेष सत्कार
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल रुपाराणी संग्रामसिंह निकम तसेच नूतन नगरसेवकांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे.
📍 पुरस्कार वितरण सोहळा
📅 शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी
🕓 दुपारी ४.०० वा.
📌 गोविंदराव टेंबे रंगमंदिर, खासबाग, कोल्हापूर
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रवीण खंडेलवाल उपस्थित राहणार असून “राष्ट्रीय व्यापार-उद्योग धोरण : आव्हाने व संधी” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
📢 उपस्थित मान्यवर
पत्रकार परिषदेस चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष राजू पाटील, भरत ओसवाल, माजी अध्यक्ष आनंद माने, सचिव वैभव सावर्डेकर यांच्यासह प्रशांत शिंदे, संचालक संपत पाटील, राहुल नस्टे, अमित कोठारी आणि धनंजय दुग्गे हे उपस्थित होते.
व्यापारी, उद्योजक व व्यावसायिकांना प्रेरणा देणारा हा सोहळा सर्वांसाठी खुला असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चेंबरतर्फे करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment