महाशिवरात्री : अज्ञान व विकारांतून मुक्तीचा दिला जाणारा शाश्वत संदेश
कोल्हापूर १० सिटी न्यूज नेटवर्क
महाशिवरात्री हा केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नसून अज्ञान, विकार आणि नकारात्मकतेतून मुक्त होण्याचा जीवनमूल्यांचा संदेश देणारा महोत्सव आहे. वासनांवर विजय मिळवून सद्गुणांचा अवलंब केल्यास जीवन आनंदी, शांत व यशस्वी होते—हाच महाशिवरात्रीचा खरा आशय असल्याचे प्रतिपादन करण्यात येत आहे.
या पवित्र पर्वानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने शहर व परिसरात विविध आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ध्यान, संस्कार परिवर्तन, संगीत व शोभायात्रांच्या माध्यमातून शिवतत्त्वाचे महात्म्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमांतून करण्यात येणार आहे.
📅 कार्यक्रमांचा तपशील
4 फेब्रुवारी
▪️ महिला संघटन महाशिवरात्री महोत्सवाचे उद्घाटन – कसबा बावडा
8 फेब्रुवारी
▪️ युवकांचे स्नेहमिलन – विनायक कॉलनी
11 फेब्रुवारी
▪️ आर. के. नगर परिसरात भव्य शोभायात्रा
12 फेब्रुवारी
▪️ शिवाजी पेठ परिसर – शोभायात्रा
▪️ किसान मेळावा
13 फेब्रुवारी
▪️ गड मुडशिंगी – शोभायात्रा
14 व 15 फेब्रुवारी
▪️ संपूर्ण शहरात ‘महानिर्वाणाचे रहस्य’ स्पष्ट करणारे आध्यात्मिक कार्यक्रम
17 फेब्रुवारी
▪️ 4-व्हीलरद्वारे जनजागृती अनाउन्समेंट
▪️ संगीत संध्या व सांस्कृतिक कार्यक्रमातून महाशिवरात्रीचे महात्म्य – राज्योपाध्येनगर
18 फेब्रुवारी
▪️ नेर्ती, तामगाव, विकासवाडी परिसर – शोभायात्रा
महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमांमधून आत्मिक शुद्धीकरण, सकारात्मक जीवनदृष्टी आणि सामाजिक ऐक्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला जाणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment