पाचगावचा पाणी प्रश्न, महागाई आणि सुरक्षिततेवर आमदार सतेज पाटील यांचा घणाघात

 पाचगावचा पाणी प्रश्न, महागाई आणि सुरक्षिततेवर आमदार सतेज पाटील यांचा घणाघात


कोल्हापूर ०५ सिटी न्यूज नेटवर्क 


आमदार सतेज पाटील यांनी पाचगाव मधील विजयी निर्धार सभेत भाजप–शिंदे गटावर जोरदार टीका केली. गेल्या वर्षभरात पाचगावच्या पाणी योजनेचं काम थांबवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला. ही निवडणूक पाचगावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी निर्णायक असल्याचं ते म्हणाले.


डबल इंजिन सरकार असूनही डाळ, खाद्यतेल, सोन्याचे दर वाढले असून सामान्य माणूस अडचणीत सापडल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात महिलांची व मुलींची सुरक्षितता धोक्यात असल्याचं उदाहरण देत सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला. वीज दरवाढीच्या प्रस्तावाला आपण विरोध केल्याचं सांगत, येणाऱ्या 15–20 टक्के वाढीसाठी भाजप सरकार जबाबदार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.


पाचगावमध्ये शांतता व विकास टिकवायचा असेल तर काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन सतेज पाटील यांनी केलं.

Comments