आजचे राशिभविष्य

 आजचे राशिभविष्य 

गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६.





माघ कृष्ण चतुर्थी.

शके १९४७, संवत २०८२.

विश्वावसुनाम संवत्सर.


राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

(संपर्क – 8087520521)


⏰ राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००


🌟 “आज शुभ दिवस आहे”

🙏 संकष्टी चतुर्थी - चंद्रोदय (मुंबई) ९.४८, नाशिक - ९.४४, पुणे ९.४३


🌙 चंद्र नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी / (नंतर) हस्त

आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या


🔭 ग्रहस्थिती विशेष:

रवी ष गुरू | चंद्र प्रतियुती शनी | चंद्र त्रिकोण हर्षल |

चंद्र प्रतियुती नेपच्यून | बुध केंद्र हर्षल


५ फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये :-


तुमच्यावर बुध आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही अत्यंत बुद्धिमान, अभ्यासू, शिस्तप्रिय आणि व्यवहार कुशल आहात. कोणतेही काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करणे हा तुमचा स्वभाव आहे. अचूक निरीक्षणशक्ती, तार्किक विचार आणि कामातील परिपूर्णता ही तुमची मोठी ताकद आहे.  


 तुम्ही स्वतःवर आणि इतरांवरही शिस्त लादता. त्यामुळे कधी कधी तुम्ही कठोर वाटू शकता. मात्र मनाने तुम्ही प्रामाणिक आणि विश्वासू आहात. संशोधन, लेखन, शिक्षण, प्रशासन, अकाउंट्स, वैद्यकीय किंवा तांत्रिक क्षेत्रात तुम्ही उत्तम यश मिळवू शकता.  


 तुमची स्मरणशक्ती चांगली असून बारकाव्यांकडे लक्ष देण्याची सवय आहे. तुम्ही भावनिक कमी आणि व्यावहारिक जास्त असता. त्यामुळे वैवाहिक जीवनात संवादाची गरज भासते. स्वतःवर जास्त ताण घेणे, चिंता करणे आणि परिपूर्णतेचा अट्टहास टाळला पाहिजे.


व्यवसाय:-


शिक्षण क्षेत्र, लेखन, अकाउंट्स, वैद्यकीय, फार्मसी, आयटी, प्रशासन, संशोधन, सल्लागार.


शुभ दिवस:-


बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार.


शुभ रंग:-


हिरवा, पांढरा, फिकट निळा.


शुभ रत्न:-


पन्ना, नीलम.

(रत्ने घेताना कुंडलीचा अवश्य विचार करा)


🌙 दैनिक राशिभविष्य


मेष:


(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

अष्टम चंद्र आहे. आज थोडी मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. मात्र संयम ठेवल्यास मार्ग नक्की मिळेल. वाद टाळा. प्रकृतीकडे लक्ष द्या.


वृषभ:


(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

सप्तम चंद्र आहे. भागीदारीत लाभ होईल. भेटीगाठी वाढतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.


मिथुन:


(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

षष्ठ चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. मात्र आर्थिक लाभही होईल. जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील.


कर्क:


(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

पंचम चंद्र आहे. संतती विषयक आनंद मिळेल. अभ्यास, स्पर्धा आणि सर्जनशील कामात यश मिळेल.


सिंह:


(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

चतुर्थ चंद्र आहे. घरगुती सुख मिळेल. वाहन, मालमत्ता विषयक विचार पुढे सरकतील.


कन्या:


(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

तृतीय चंद्र आहे. धाडसी निर्णय घ्याल. संवाद कौशल्यामुळे यश मिळेल. भावंडांकडून सहकार्य लाभेल.


तुळ:


(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

द्वितीय चंद्र आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल. कुटुंबात समाधानकारक वातावरण राहील.


वृश्चिक:


(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

प्रथम चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. मात्र उतावळेपणा टाळा. निर्णय विचारपूर्वक घ्या.


धनु:


(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

बारावा चंद्र आहे. खर्च वाढेल. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. ध्यान उपयुक्त ठरेल.


मकर:


(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

एकादश चंद्र आहे. अपेक्षित लाभ होईल. मित्रांकडून मदत मिळेल. इच्छापूर्तीचा दिवस.


कुंभ:


(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

दशम चंद्र आहे. कामात प्रगती होईल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. जबाबदारी वाढेल.


मीन:


(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

नवम चंद्र आहे. भाग्याची साथ मिळेल. धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभाग घ्याल.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय व इतर मार्गदर्शन, “राशीभाव” कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाविषयी माहिती मिळवण्यासाठी संपर्क साधा – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)


Comments