आजचे राशिभविष्य
शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६
आज जन्मलेल्या आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये :-
माघ कृष्ण पंचमी.
शके १९४७, संवत २०८२.
विश्वावसुनाम संवत्सर.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
(संपर्क – 8087520521)
⏰ राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
🌟 आज उत्तम दिवस आहे.
🌙 चंद्रनक्षत्र – हस्त
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या
🔭 ग्रहयोग विशेष:
रवी त्रिकोण चंद्र | चंद्र त्रिकोण मंगळ | चंद्र केंद्र गुरू
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:
(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
चंद्राचे शुभ त्रिकोण योग असल्याने दिवस अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक लाभ होतील. कामानिमित्त प्रवास घडतील. इच्छापूर्तीचा दिवस आहे.
वृषभ:
(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल. दुपारनंतर चांगली बातमी मिळेल. नोकरी व व्यवसायात समाधानकारक प्रगती होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मिथुन:
(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
संवाद कौशल्याचा उत्तम उपयोग होईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. व्यापारात करार पूर्ण होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल.
कर्क:
(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
चंद्र–गुरू केंद्र योगामुळे मान-सन्मान वाढेल. आर्थिक प्रगती होईल. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. अचानक लाभ संभवतो.
सिंह:
(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल. वरिष्ठांची साथ मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे. आत्मविश्वास टिकवून ठेवा.
कन्या:
(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
चंद्र तुमच्याच राशीत असल्याने मन प्रसन्न राहील. नियोजनबद्ध कामे पूर्ण होतील. आरोग्य सुधारेल. प्रवासातून लाभ होतील.
तुळ:
(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
आर्थिक उलाढाल वाढेल. व्यावसायिक प्रगतीचा वेग चांगला राहील. स्पर्धेत यश मिळेल. घरगुती व व्यावसायिक समतोल साधावा लागेल.
वृश्चिक:
(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
दुपारनंतर ग्रहमान अधिक अनुकूल होईल. व्यवसाय विस्तारेल. आर्थिक आवक चांगली राहील. गुप्त शत्रूंपासून सावध रहा.
धनु:
(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भाग्याची साथ मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. स्थावर संपत्ती विषयक लाभ संभवतात. पूर्वजांचे आशीर्वाद लाभतील.
मकर:
(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
सुरुवात थोडी संथ वाटेल मात्र दुपारनंतर कामे वेगाने पूर्ण होतील. प्रवास लाभदायक ठरेल. अहंकार टाळा.
कुंभ:
(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
प्रगती साधणारा दिवस आहे. मन आनंदी राहील. वाकसिद्धी प्राप्त होईल. जोडीदार किंवा भागीदाराच्या व्यवसायात वाढ होईल.
मीन:
(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
नवीन संधी प्राप्त होतील. नोकरी/व्यवसायात समाधान मिळेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. छंद जोपासण्यासाठी वेळ मिळेल.
६ फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये :-
तुमच्यावर बुध आणि गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही बुद्धिमान, शिस्तप्रिय आणि नैतिक मूल्यांवर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहात. ज्ञानसंपादनाची आवड, तार्किक विचार आणि स्पष्ट निर्णयक्षमता ही तुमची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
तुम्ही अभ्यासू, संशोधक वृत्तीचे आणि मार्गदर्शक स्वभावाचे असता. इतरांना शिकवणे, योग्य दिशा देणे तुम्हाला आवडते. तुमच्या बोलण्यात प्रभाव असतो. त्यामुळे लोक तुमचे ऐकतात.
तुम्ही व्यवहारात प्रामाणिक असून दीर्घकालीन यशावर विश्वास ठेवता. उतावळेपणा टाळल्यास आयुष्यात मोठे यश मिळवता. कुटुंबावर प्रेम करणारे आणि जबाबदारी निभावणारे व्यक्तिमत्त्व आहे.
व्यवसाय:-
शिक्षण, अध्यापन, सल्लागार, लेखन, प्रशासन, वैद्यकीय, अकाउंट्स, संशोधन, कायदा.
शुभ दिवस:-
बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:-
हिरवा, पिवळा, फिकट निळा.
शुभ रत्न:-
पन्ना, पुष्कराज.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या.
कुंडली परीक्षणासाठी कृपया संपर्क करा –
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments
Post a Comment