ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारताची पाकिस्तानवर मात


ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारताची पाकिस्तानवर मात; छत्रपती शिवाजी चौकात फटाके, घोषणांनी आसमंत दणाणला



कोल्हापूर १५ सिटी न्यूज नेटवर्क 

ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर तब्बल 61 धावांनी दणदणीत विजय मिळवत क्रिकेटप्रेमींना आनंदाची पर्वणी दिली. पारंपरिक प्रतिस्पर्ध्यावर मिळालेल्या या शानदार विजयाचा जल्लोष कोल्हापुरात उसळला.

विजयाचा क्षण निश्चित होताच शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथे शेकडो युवकांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला. हातात तिरंगा फडकवत “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”च्या घोषणा देत वातावरण देशभक्तीने भारावून गेले.

फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि एकमेकांना मिठ्या मारत क्रिकेट चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. अनेकांनी मोबाईलच्या फ्लॅशलाइट लावून विजयाचे क्षण टिपले. चौक परिसर काही काळ पूर्णपणे जल्लोषमय झाला होता.

भारताच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी दमदार कामगिरी करत पाकिस्तानला नमवले. संघाच्या एकजुटीमुळे आणि नियोजनबद्ध खेळीमुळे हा विजय शक्य झाल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली.

कोल्हापुरातील हा उत्साह पाहता, क्रिकेट हा केवळ खेळ नसून भारतीयांच्या भावना आणि अभिमानाशी जोडलेला आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती आली. 🇮🇳🔥

Comments