पाडळी खुर्दमध्ये महिला शक्तीने रणशिंग फुंकले! डॉ. के. एन. पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचा घरोघरी जनसंपर्क
पाडळी खुर्दमध्ये महिला शक्तीने रणशिंग फुंकले! डॉ. के. एन. पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचा घरोघरी जनसंपर्क
कोल्हापूर ०४ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर पाडळी खुर्द मतदारसंघात काँग्रेसने महिला शक्तीच्या जोरावर प्रचाराला वेग दिला आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. के. एन. पाटील यांच्या विजयासाठी महिलांनी थेट घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले.
या प्रचारादरम्यान “विकास, विश्वास आणि लोकहित” या मुद्द्यांवर भर देत, गेल्या काळातील काँग्रेसच्या कामगिरीचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडण्यात आला. विशेषतः आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासासाठी डॉ. के. एन. पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या घरोघरी प्रचार मोहिमेत अर्चना विनोद पाटील, सरिता सासणे, सुनीता मिठारी, गीता पाटील, कांचन पाटील, विमल पाटील, माधुरी तानुगडे, गीता के. एन. पाटील, राजश्री पाटील, संगीता पाटील, आशा भोसले, शीतल पाटील, सुजाता पाटील, रेखा पाटील, सृष्टी पोवार, जया पाटील आदी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
महिलांचा हा उत्स्फूर्त सहभाग पाहता पाडळी खुर्द मतदारसंघात काँग्रेसच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून, “महिला मतदारांचा कौल हाच विजयाचा कणा ठरणार” असा राजकीय संदेश या प्रचारातून देण्यात आला आहे.

Comments
Post a Comment