डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांचा ६२ वा वाढदिवस उत्साहात साजरा
कोल्हापूर १८ सिटी न्यूज नेटवर्क
डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष तसेच डी. वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूर, तळसंदे व आकुर्डीचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ६२ वा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी तसेच कदमवाडी येथील मेडिकल कॉलेज सभागृहात मोठी उपस्थिती लावून शुभेच्छांचा वर्षाव केला. शिक्षण, आरोग्य, कृषी व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. पाटील यांच्यासह त्यांच्या स्नुषा व डी. वाय. पाटील ग्रुपच्या अॅडव्हायझर सौ. पूजा ऋतुराज पाटील यांचाही वाढदिवस एकाच दिवशी असल्याने कुटुंबीयांकडून दोघांचाही वाढदिवस एकत्रितपणे साजरा करण्यात आला.
यावेळी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील आणि सौ. शांतादेवी डी. पाटील यांनी डॉ. संजय डी. पाटील व सौ. पूजा पाटील यांना शुभाशीर्वाद दिले. कार्यक्रमास सौ. वैजयंती संजय पाटील, माजी आमदार ऋतुराज संजय पाटील, पृथ्वीराज संजय पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, सत्यजित पाटील बेनाडीकर, अभिजित पाटील बेनाडीकर, अर्जुन व आर्यमन पाटील यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.
डॉ. पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, देवराज पाटील, शिवाजी विद्यापीठचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. ए. एन. जाधव, उद्योजक दिलीप मोहिते, आनंद माने, प्रताप उर्फ भैय्या माने, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, डॉक्टर, उद्योजक, माजी पोलीस अधिकारी, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, तसेच कोल्हापूर महानगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
तसेच डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. व्ही. व्ही. भोसले, आकुर्डी कॅम्पसचे डायरेक्टर अमित विक्रम, विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे संपादक, अधिकारी व पत्रकार यांनीही शुभेच्छा दिल्या. अनेक मान्यवरांनी दूरध्वनीद्वारेही शुभेच्छा व्यक्त केल्या.
दुर्मिळ माहिती संग्रह प्रदर्शन
डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मेडिकल कॉलेजच्यावतीने दुर्मिळ माहिती संग्रह प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये कोल्हापूरमधील विविध ठिकाणे, वैशिष्ट्ये आणि ऐतिहासिक घडामोडींविषयी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या कात्रणांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या प्रदर्शनास उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


Comments
Post a Comment