जिल्हा परिषद निवडणुकीचा ‘सुपर संडे’; संग्राम पाटील–सीमा पोवाळकर–प्रियांका पाटील प्रचारात सक्रिय

 

जिल्हा परिषद निवडणुकीचा ‘सुपर संडे’; संग्राम पाटील–सीमा पोवाळकर–प्रियांका पाटील प्रचारात सक्रिय



कोल्हापूर १ सिटी न्यूज नेटवर्क 


पाचगाव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रचाराचा अक्षरशः सुपर संडे अनुभवायला मिळाला. जिल्हा परिषद निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील, पंचायत समितीच्या उमेदवार सौ. सीमा पोवाळकर आणि सरपंच प्रियांका संग्राम पाटील यांच्या सक्रिय सहभागाने संपूर्ण मतदारसंघात राजकीय वातावरण ढवळून निघालं.



घराघरांत प्रत्यक्ष भेटी, नागरिकांशी थेट संवाद, विकासकामांचा लेखाजोखा आणि पुढील पाच वर्षांचा ठोस आराखडा मांडत संग्राम पाटील यांनी विकास हाच आमचा अजेंडा असल्याचा स्पष्ट संदेश दिला. ग्रामस्थांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता परिवर्तनाची लाट स्पष्टपणे जाणवत होती.

यावेळी बोलताना सौ. सीमा पोवाळकर म्हणाल्या,
“महिला, शेतकरी, युवक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पंचायत समितीत सक्षम आणि निर्भय आवाज पोहोचवणे हाच आमचा निर्धार आहे.”

पाचगावच्या सरपंच प्रियांका संग्राम पाटील यांनी देखील प्रचारात अग्रेसर होऊन महिला, युवक आणि ग्रामस्थांना मतदानासाठी सक्रिय केले. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि समर्थक जोरदार प्रचारात सहभागी झाले, ज्यामुळे प्रचार फेरीत ऊर्जा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणा आणि जल्लोषात झालेल्या या प्रचार फेरीमुळे विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली असून, पाचगाव मतदारसंघात लढत आता निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. 

एकंदरीत, पाचगाव जिल्हा परिषद निवडणुकीत संग्राम पाटील, सीमा पोवाळकर आणि सरपंच प्रियांका संग्राम पाटील यांच्या ‘सुपर संडे’ प्रचाराने विजयाची मजबूत नांदी दिल्याचे चित्र आहे. 

यावेळी सुहास काशीद, विनायक सुतार,अमर बावडेकर ,निलेश टिपुगडे ,वसीम मुजावर, सुरेश बावडेकर, स्वप्निल कांबळे 

प्रगतीनगर  मधील महिला डि.जी ग्रुपचे सर्व कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

Comments