BSFS ( 64 स्क्वेअर चेस क्लब) शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अथर्व तावरे विजेता ; श्रेयस पाटील उपविजेता तर विवेक चित्रकार तृतीय स्थानी

 BSFS ( 64 स्क्वेअर चेस क्लब) शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अथर्व तावरे विजेता ; श्रेयस  पाटील उपविजेता तर विवेक चित्रकार तृतीय स्थानी



कोल्हापूर ९ सिटी न्यूज नेटवर्क 

- चेस असोसिएशन कोल्हापूर च्या मान्यतेने सिक्स्टी फोर स्क्वेअर चेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने BSFS -  सोळा वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत स्पर्धेचे उद्घाटन माननीय श्री मनोज महाडेश्वर व श्री सागर पाटील यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून झाले.

यावेळी चेस असोसिएशन कोल्हापूरचे सचिव मनीष मारुलकर , आरती मोदी ,आदित्य सावळकर आणि अनेक बुद्धिबळ प्रेमी उपस्थित होते .

अंतिम फेरीनंतर खुल्या गटामध्ये  मुसळे हायस्कूलच्या अथर्व तावरे याने आठ पैकी सात गुण मिळवून जेतेपद पटकावले तसेच गडहिंग्लजच्या श्रेयस पाटील याने आठ पैकी सहा गुण मिळवून उपविजेतेपद पटकावले. 

चेस असोसिएशन कोल्हापूर आणि 64 स्क्वेअर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने BSFS -16 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत एकूण 97 बुद्धिबळपटूंनी सहभाग नोंदवला .या स्पर्धा चेस असोसिएशन कोल्हापूर अयोध्या टॉवर्स , दाभोळकर कॉर्नर येथील चेस हॉलमध्ये घेण्यात आल्या.

स्पर्धेसाठी इचलकरंजी, कागल ,रत्नागिरी, पन्हाळा , इस्लामपूर, गडहिंग्लज इत्यादी तालुक्यांमधून खेळाडू आले होते सात फेऱ्यांमध्ये स्विस  लीग पद्धतीने ही स्पर्धा झाली . या स्पर्धेत खुल्या गटांमध्ये विवेक चित्रकार यांनी सहा गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. 

बिगर मानांकित गटामध्ये सेंट झेवियर च्या पियुष गबाळे यांनी पाच गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. 

बेस्ट गर्ल्स गटामध्ये मध्ये साक्षी साखरे हिने चार गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला.

नऊ वर्षाखालील गटामध्ये  माईसाहेब बावडेकर च्या विवान परांजपे यांने चार गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. 

 12 वर्षाखालील गटामध्ये वंशील ठक्कर याने पाच गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. 

पंधरा वर्षाखालील गटामध्ये प्रथमेश व्यापारी याने  पाच गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला.

स्पर्धेचा बक्षीस वितरण श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे श्री सुशांत करोसे,चेस असोसिएशन कोल्हापूरचे उपाध्यक्ष धीरज वैद्य, मुख्य पंच आरती मोदी , पंच आदित्य सावळकर,  श्री मनोज महाडेश्वर, श्री सागर पाटील व श्री सचिन वणिरे , इत्यादी मान्यवरांच्या हस्ते झाले.

सदर स्पर्धे साठी विशेष मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय पंच व व चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष श्री भरत चौगुले, सचिव श्री मनीष मारुलकर, मुख्य पंच आरती मोदी व आदित्य सावळकर यांचे लाभले.ही स्पर्धा विद्यार्थ्यांनी  विद्यार्थ्यांकरीता  भरवली  . विद्यार्थ्यांमध्ये मानस महाडेश्वर व आर्यन पाटील यांनी ही स्पर्धा शिस्तबद्धपणे आयोजित केली . सुमित पावसकर आणि श्रेयस जवाहिरे   यांचा मोलाचा वाटा आहे. या स्पर्धेसाठी युनिव्हर्सल सेक्युरिटी सर्व्हिसेस चे कॅप्टन उत्तम पाटील, प्रोऍक्टिव्ह अबॅकस, श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जसवंत स्वीट्स आणि भारत डेअरी -स्फूर्ती यांचे  सहकार्य लाभले.

Comments