रेणुका देवी विवाह सोहळा १ एप्रिलला; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क
श्री जगतमाता रेणुका यल्लम्मा देवस्थान, कोल्हापूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही रेणुका देवीचा पारंपरिक विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार असून भाविकांना उपस्थित राहून देवीचा कृपाशिर्वाद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३१ मार्च २०२६ रोजी सायं. ५.०० वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर मुख्य विवाह सोहळा दि. १ एप्रिल रोजी होणार असून दुपारी १२.१५ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा पोतदार इंटरनॅशनल स्कूल, सुनंदा पार्क येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात.
या सोहळ्याचे यजमान आदित्य नारायणराव बुजरे असून अधिक माहितीसाठी त्यांनी संपर्क क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे.
भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment