आजचे राशिभविष्य
मंगळवार, ३१ मार्च २०२६.
चैत्र शुक्ल त्रयोदशी/चतुर्दशी. वसंत ऋतू. पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
आज चांगला दिवस आहे. *भगवान महावीर जयंती*, महादेवाला दवणा वाहणे.
चंद्र नक्षत्र - पूर्वा / (दुपारी ३.२१ नंतर) उत्तरा
आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह / (रात्री ९.३३ नंतर) कन्या.
३१ मार्च रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर हर्षल आणि गुरूचा प्रभाव आहे. तुमच्या आयुष्यात अनपेक्षित चढ उतार होतात. तुमचे आयुष्य गतिमान असते. चांगले अनुभव आणि अनुकूल बदल घडतात. तुम्ही झटपट निर्णय घेतात. तुमच्या बुद्धीचा उपयोग मानव जातीच्या कल्याणासाठी तुम्ही करतात. तुम्हाला खोटेपणा आवडत नाही. तुम्ही आकर्षक असतात. संधी मिळाल्यास तुम्ही उत्तम गुणदर्शन करतात. तुम्ही तुमचे विचार इतरांवर लादतात. तुमच्यात आत्मविश्वास असतो. इतरांना तुम्ही सर्वकाही मोकळेपणाने सांगत नाहीत. जीवनात सतत बदल घडावा से तुम्हाला वाटते. मान सन्मान आणि झटपट पैसे कमावणे याकडे तुमचा कल असतो.
तुम्ही हुशार असून स्वभाव विचारी आणि अपुलकीयुक्त असतो. तुम्ही सतत कार्यमग्न असतात. शास्त्रीय आणि धार्मिक पुस्तके तुम्हाला आवडतात. चांगली नोकरी मिळते आणि पैसे चांगले कमवतात. वयाच्या ३१ नंतर भाग्योदय होतो. स्वतःच्या भावना तुम्हाला व्यक्त करता येत नाहीत. तुमच्यात चांगले संभाषण चातुर्य असते. तुम्ही काटेकोरपणे काम करतात आणि त्यात तुम्हाला यश मिळते. बुद्धिमान आणि हुशार वर्तुळात वावरणे तुम्हाला आवडते.
तुमचा स्वभाव अस्थिर असतो. तुम्ही अनपेक्षित कृती करतात. भिन्न लिंगी व्यक्तीपासून तुम्हाला फायदा होतो. आयुष्यत मोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडतात. कौटुंबिक जीवन सुखाचे असते मात्र मित्र मैत्रिणीची गरज भासते.
धर्मादाय काम करण्यात तुम्हाला आनंद मिळतो. उत्तम स्मरणशक्ती आणि जबर इच्छाशक्ती असते. तुम्ही गरीब दिसतात पण हेकेखोर असू शकतात. तुम्ही सतत वाद घालणे किंवा वैचारिक विरोध करणे टाळले पाहिजे.
व्यवसाय:- इंजिनीअर, बिल्डर, शास्त्रज्ञ, उद्योगपती, बँकिंग, इंटेरिअर डेकोरेटर.
शुभ रंग - निळा, पांढरा, लालसर, राखाडी.
शुभ दिवस: शनिवार, रविवार, सोमवार.
शुभ रत्न:- हिरा, पोवळे, मोती.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)
चंद्र-मंगळ प्रतियुतीमुळे उत्साह वाढेल. धाडसी निर्णय घ्याल. मात्र रागावर नियंत्रण ठेवा. कामाचा ताण जाणवेल.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नवीन वस्तू खरेदी कराल. प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)
घरात बदल आणि सजावट कराल. नवीन योजना यशस्वी होतील. मात्र आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)
धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. धाडसी निर्णय यशस्वी ठरतील. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)
चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. मात्र मंगळामुळे अस्थिरता येऊ शकते. संयम ठेवा.
कन्या:-(टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)
रात्रीनंतर चंद्र राशीत येईल. बुद्धिमत्तेचा उत्तम उपयोग कराल. कामात प्रगती होईल. सहकार्य कमी मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)
मन अस्वस्थ राहील. काही गोष्टींची चिंता वाढेल. उपासना आणि ध्यान उपयुक्त ठरेल.
वृश्चिक:-(तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)
खर्च वाढेल. प्रतिष्ठेसाठी खर्च करावा लागू शकतो. रागामुळे नुकसान टाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)
कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांचा दबाव जाणवेल. संयमाने काम केल्यास यश मिळेल.
मकर:-(भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)
मानसिक ताण वाढेल. प्रवासात बदल होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.
कुंभ:-(गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)
अष्टम चंद्रामुळे मन अस्थिर राहील. संततीबाबत चिंता वाटेल. निर्णय विचारपूर्वक घ्या.
मीन:-(दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)
घर आणि कुटुंबावर लक्ष द्यावे लागेल. जोडीदाराचा सल्ला उपयोगी ठरेल. काही कामे पुढे ढकलावी लागतील.
सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
8087520521

Comments
Post a Comment