आजचे राशिभविष्य
रविवार, २९ मार्च २०२६
. चैत्र शुक्ल एकादशी/द्वादशी. वसंत ऋतू. पराभवनाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - संध्याकाळी ४.३० ते ६.००
"आज चांगला दिवस आहे"
चंद्रनक्षत्र - आश्लेषा / (दुपारी २.३८ नंतर) मघा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - कर्क / (दुपारी २.३८ नंतर) सिंह.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
🐏 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आज चंद्र चतुर्थ/पंचम स्थानातून भ्रमण करीत आहे. दिवस मिश्र असला तरी चांगल्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात प्रगती होईल. कामात स्पर्धा वाढेल पण यश मिळेल. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.
🐂 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
तृतीय/चतुर्थ चंद्र अनुकूल आहे. घरगुती सुख मिळेल. नवीन वस्तू खरेदी कराल. संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. व्यवसायात प्रगती होईल.
👫 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
द्वितीय/तृतीय चंद्रामुळे प्रवास संभवतो. कुटुंबीयांसोबत वेळ घालवाल. मानसिक समाधान मिळेल. वाहन किंवा घरासंबंधित निर्णय घ्याल.
🦀 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
आज तुमच्या राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ संभवतो. दुपारनंतर खर्च वाढेल.
🦁 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
दुपारनंतर चंद्र तुमच्या राशीत येईल. व्यक्तिमत्त्व खुलून दिसेल. नवीन योजना आखाल. मान-सन्मान वाढेल. आवडत्या व्यक्तीची भेट होईल.
👩🌾 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
द्वादश चंद्रामुळे खर्च वाढेल. तरीही काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. प्रवास संभवतो.
⚖️ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
दुपार नंतर लाभ स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. नवीन ओळखी होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
🦂 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
दशम चंद्रामुळे कामात यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. व्यवसायात प्रगती होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल.
🏹 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
अष्टम/नवम चंद्र अनुकूल आहे. भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल. प्रवास लाभदायक ठरेल.
🐐 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
सप्तम/अष्टम चंद्रामुळे थोडा ताण जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्या. अचानक खर्च संभवतो. संयम ठेवल्यास दिवस चांगला जाईल.
🏺 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
सप्तम चंद्रामुळे संबंध दृढ होतील. जोडीदारासोबत वेळ घालवाल. व्यवसायात भागीदारीत लाभ होईल. नवीन संधी मिळतील.
🐟 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
षष्ठ चंद्रामुळे कामात व्यस्तता वाढेल. प्रयत्नांना यश मिळेल. शत्रूंवर विजय मिळवाल. आरोग्य सुधारेल.
🌼 विशेष सूचना:
कामदा एकादशीचे व्रत केल्यास पापक्षय होतो व मनोकामना पूर्ण होतात. गंडांत नक्षत्र असल्याने शांती विधी करणे लाभदायक ठरेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 📞 8087520521

Comments
Post a Comment