ज्येष्ठ इतिहास संशोधक स्वर्गीय डॉ. जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सांत्वन

 ज्येष्ठ इतिहास संशोधक स्वर्गीय डॉ. जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सांत्वन



कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क 

ज्येष्ठ इतिहास संशोधक स्वर्गीय डॉ. जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांची आज खासदार Dhananjay Mahadik यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सखोल आणि चौफेर अभ्यासातून इतिहास मांडणाऱ्या एका व्यासंगी व्यक्तिमत्त्वाला आपण मुकल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

डॉ. जयसिंगराव पवार यांचे नुकतेच निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने इतिहास संशोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. खासदार महाडिक यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची विचारपूस केली. यावेळी डॉ. पवार यांच्या दोन्ही कन्या आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Dr. Jayasingrao Pawar यांच्या रूपाने कोल्हापूरला एक द्रष्टा आणि साक्षेपी अभ्यासक लाभला होता. वर्षानुवर्षे अंधारात असलेल्या अनेक महापुरुषांचे चरित्र समाजासमोर आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे इतिहास संशोधन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना खासदार महाडिक यांनी व्यक्त केली.

Comments