कागलमध्ये नाम.हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान; शाळा-महाविद्यालय परिसर झाला स्वच्छ
कागलमध्ये नाम.हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान; शाळा-महाविद्यालय परिसर झाला स्वच्छ
कोल्हापूर (कागल) २५ सिटी न्यूज नेटवर्क
वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागल शहरात स्वच्छतेचा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. शहरातील विविध विद्यालये, शाळा व महाविद्यालय परिसर स्वच्छ करून समाजाला स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
या स्वच्छता अभियानात केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कागल येथील ऐतिहासिक खर्डेकर चौक, हिंदूराव घाटगे शाळा व परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमाला स्थानिक नागरिक व तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदवला.
यावेळी पक्षप्रतोद सतीश घाटगे, नगरसेवक अर्जुन नाईक यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी मिळून परिसरातील कचरा साफ करून स्वच्छ व सुंदर कागल घडविण्याचा संकल्प व्यक्त केला.
या उपक्रमामुळे शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती होऊन नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. वाढदिवस साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला.


Comments
Post a Comment