कोल्हापुरात ‘श्रीराम जन्मोत्सव सोहळा’ उत्साहात; मिरजकर तिकटी येथे तीन दिवस धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
कोल्हापुरात ‘श्रीराम जन्मोत्सव सोहळा’ उत्साहात; मिरजकर तिकटी येथे तीन दिवस धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क
येथील मंगलवार पेठ, मिरजकर तिकटी येथे *‘हिंदू एकता आंदोलन, कोल्हापूर’*च्या वतीने सन २०२६ चा श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गुरुवार, दि. २६ मार्च ते शनिवार, दि. २८ मार्च या कालावधीत हा उत्सव होणार असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांसाठी उपलब्ध असणार आहे.
📌 कार्यक्रमांचे नियोजन
उत्सवाची सुरुवात गुरुवार, दि. २६ मार्च रोजी सकाळी १० वाजता प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सव आणि पारंपरिक पाळणा सोहळ्याने होईल. त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता इस्कॉन मंदिर यांच्या वतीने भक्तीमय भजन व कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शुक्रवार, दि. २७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता रामरक्षा पठण आयोजित करण्यात आले आहे.
उत्सवाची सांगता शनिवार, दि. २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणार असून, यावेळी सर्व भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
🙏 भाविकांना आवाहन
या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात कोल्हापूरकरांनी व रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
👥 आयोजन समिती
या उत्सवाचे नियोजन दिपक देसाई, हिंदूराव शेळके, विलास मोहिते, वैभव कवडे, अनिकेत पवार, शिवाजी चिले व इतर कार्यकर्त्यांनी केले आहे.


Comments
Post a Comment