‘गोकुळ’ परिवाराकडून नामदार हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा
कोल्हापूर, ता. २६ सिटी न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त ‘गोकुळ’ परिवाराच्या वतीने विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करून वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत हे उपक्रम राबविण्यात आले.
या कार्यक्रमांना संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील, चेअरमन नविद मुश्रीफ, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील यांनी नामदार हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेले वरदान असल्याचे सांगितले. त्यांच्या कार्यकाळात विकासाला गती मिळाली असून समाजातील वृद्ध, अपंग, निराधार व रुग्ण घटकांसाठी त्यांनी संवेदनशीलतेने काम केले आहे. प्रत्येक घटकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
वाढदिवसानिमित्त ‘गोकुळ’ कार्यालय, ताराबाई पार्क येथे औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे रुग्ण, त्यांच्या नातेवाईक व कर्मचाऱ्यांना मोफत फळे व सुगंधी दूध वाटप करण्यात आले.
याचबरोबर जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना (बालकल्याण संकुल), कोल्हापूर येथे मुलांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. या उपक्रमांमधून ‘गोकुळ’ परिवाराने वाढदिवस साजरा करण्याचा एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
या प्रसंगी चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन विश्वास पाटील, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, बालकल्याण संकुलच्या मानद कार्यवाह श्रीमती पद्मजा तिवले, पी. के. डवरी, सचिन माने, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. पी. जे. साळुंके, सहायक व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, डॉ. एम. पी. पाटील, लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते.



Comments
Post a Comment