रिलायन्सच्या भागीदारीत ‘टाइम 100 नेक्स्ट' प्रथमच भारतात
मुंबई २४ सिटी न्यूज नेटवर्क
डिसेंबर 2026 मध्ये होणाऱ्या पहिल्या "टाइम 100 नेक्स्ट इंडिया" उपक्रमात विविध क्षेत्रांतील 100 उदयोन्मुख भारतीय नेत्यांचा गौरव केला जाणार
न्यूयॉर्क, 23 एप्रिल 2026: TIME ने आपल्या "टाइम 100 नेक्स्ट" या प्रतिष्ठित उपक्रमाचे नवीन भारतीय संस्करण ‘टाइम 100 नेक्स्ट इंडिया ’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्सच्या भागीदारीत सुरू होणाऱ्या या उपक्रमाद्वारे भारतातील पुढील पिढीतील नेत्यांचा गौरव केला जाईल, जे आपल्या कार्य आणि दृष्टीकोनातून देशाच्या भविष्यास आकार देत आहेत.
ही घोषणा न्यूयॉर्क शहरात आयोजित वार्षिक TIME100 गाला कार्यक्रमादरम्यान टाइम चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेसिका सिब्ली आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा सौ. नीता मुकेश अंबानी यांनी संयुक्तपणे केली.
टाइम 100 नेक्स्ट इंडिया यादी TIME चे संपादक तयार करतील. या यादीत भारत आणि भारतीय वंशाच्या 100 उदयोन्मुख नेत्यांचा समावेश असेल, जे कला, विज्ञान, व्यवसाय, क्रीडा, सामाजिक कार्य आदी विविध क्षेत्रांत भविष्य घडवत आहेत. ही यादी ऑनलाइन प्रकाशित केली जाईल आणि डिसेंबर 2026 मध्ये मुंबईतील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित भव्य समारंभात साजरी केली जाईल.
“टाइम 100 नेक्स्ट " प्रथमच भारतात आणताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे,” असे TIME च्या मुख्य कार्यकारी अधिकारी जेसिका सिब्ली यांनी सांगितले. “हा उपक्रम विविध उद्योगांमध्ये प्रगती घडवणाऱ्या पुढील पिढीतील नेत्यांचा गौरव करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हा उपक्रम साकार करण्यात रिलायन्सच्या भागीदारीबद्दल आम्ही आभारी आहोत.”
रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा सौ. नीता एम. अंबानी म्हणाल्या, “रिलायन्समध्ये आम्ही भारताचे भविष्य घडवण्यासाठी पुढील पिढीतील प्रतिभा, कल्पना आणि नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यास कटिबद्ध आहोत. TIME सोबत भागीदारी करून प्रथमच भारतात टाइम 100 नेक्स्ट इंडिया उपक्रम आणताना आम्हाला आनंद होत आहे. जगातील सर्वोत्तम भारतात आणणे आणि भारतातील सर्वोत्तम जगासमोर सादर करणे हे आमचे नेहमीचे ध्येय राहिले आहे.”
TIME चे मुख्य धोरण अधिकारी आणि कार्यकारी संपादक डॅन मॅक्साय म्हणाले, “टाइम 100 नेक्स्ट" हे पुढील दशकांमध्ये दिशा ठरवणाऱ्या नेत्यांना ओळख देणारे प्रभावी व्यासपीठ बनले आहे. भारतात विस्तार केल्यामुळे एका महत्त्वाच्या टप्प्यावर असलेल्या विलक्षण प्रतिभावान पिढीवर प्रकाश टाकण्याची आणि त्यांच्या कथा जागतिक स्तरावर मांडण्याची संधी मिळेल.”
टाइम 100 नेक्स्ट इंडिया चा प्रारंभ हा TIME100 उपक्रमाच्या जागतिक विस्तारातील महत्त्वाचा टप्पा आहे आणि टाइम 100 नेक्स्टचे हे पहिले आंतरराष्ट्रीय संस्करण ठरणार आहे. 2021 पासून TIME ने आंतरराष्ट्रीय स्तरावर "टाइम 100 इम्पॅक्ट अवॉर्ड्स" कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि आपल्या वेगाने वाढणाऱ्या जागतिक इव्हेंट्स विभागाद्वारे पाच खंडांतील शहरांमध्ये कार्यक्रम आयोजित केले आहेत.
टाइम 100 नेक्स्ट इंडिया यादी आणि समारंभाबाबत अधिक तपशील येत्या काही महिन्यांत जाहीर केले जातील

Comments
Post a Comment