गोकुळ निवडणूक 2026: महायुती एकत्र लढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत मोठा निर्णय

 


गोकुळ निवडणूक 2026: महायुती एकत्र लढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत मोठा निर्णय



मुंबई २९ सिटी न्यूज नेटवर्क 


मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी उशिरा रात्री मुंबईत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत गोकुळच्या आगामी निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत गोकुळची निवडणूक महायुती म्हणून एकसंघ पद्धतीने लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.



मुख्यमंत्र्यांनी सर्व महायुतीतील घटक पक्षांनी एकदिलाने आणि एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी स्पष्ट सूचना केली. या प्रस्तावाला बैठकीत उपस्थित सर्व नेत्यांनी एकमुखाने संमती दर्शवली.

राज्यातील सहकार क्षेत्रात आणि दुग्ध व्यवसायात गोकुळ संस्थेचे मोठे योगदान असल्याचे नमूद करत, हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीत गोकुळची महत्त्वाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले. गोकुळची प्रगती अधिक वेगाने आणि विकासाभिमुख होण्यासाठी सर्वांनी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

 या बैठकीला नामदार चंद्रकांत दादा पाटील, नामदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार विनय कोरे, गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, संचालिका शौमिका महाडिक, समित कदम उपस्थित होते.

या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे गोकुळ निवडणुकीत महायुतीकडून एकसंघ लढत पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments