राष्ट्रसेविका समितीचा ‘विजय घोष 2026’ भव्य उपक्रम १ मे रोजी कोल्हापुरात
कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क
राष्ट्र पुनर्निर्माण आणि महिला सबलीकरणासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या स्थापनेला यंदा ९० वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्ताने पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने महाराष्ट्र दिन (१ मे) रोजी कोल्हापुरात ‘विजय घोष 2026’ या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम कोल्हापुरातील प्रायव्हेट स्कूलच्या मैदानावर संपन्न होणार असून, यात घोष प्रात्यक्षिके, सांधिक वादन आदी आकर्षक सादरीकरणांचा समावेश असणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ तबलावादक उपस्थित राहणार आहेत. तसेच समितीच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व अभिलेखागार प्रमुख या प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
समितीच्या ९० वर्षांच्या पूर्तीनिमित्त कोल्हापूरसह एकाच दिवशी चार ठिकाणी एकाच वेळी हा सोहळा पार पडणार आहे, ही या उपक्रमाची विशेष बाब आहे.
या ‘विजय घोष 2026’ सोहळ्यास सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रसेविका समिती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment