कोल्हापूरात 24 मे रोजी ‘श्री स्वामी समर्थ’ यांच्या जीवनावर रॅप साँगचे भव्य लॉन्चिंग | पहिल्यांदाच भक्ती आणि रॅपचा संगम
कोल्हापूरात 24 मे रोजी ‘श्री स्वामी समर्थ’ यांच्या जीवनावर रॅप साँगचे भव्य लॉन्चिंग | पहिल्यांदाच भक्ती आणि रॅपचा संगम
कोल्हापूर, दि. २६ सिटी न्यूज नेटवर्क
ब्रम्हह्मांडनायक श्री स्वामी समर्थ यांच्या स्वामीलिला अनुभूतीवर आधारित पहिल्यांदाच मराठी रॅप साँग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या अनोख्या संकल्पनेचा भव्य लॉन्चिंग सोहळा 24 मे 2026 रोजी कोल्हापूरात आयोजित करण्यात येणार आहे.
श्री स्वामी समर्थांवर यापूर्वी अनेक मराठी भक्तीगीते आणि चित्रपट साकारले गेले असले, तरी स्वामींच्या लीलांचा आधुनिक पद्धतीने रॅप माध्यमातून केलेला हा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे भक्ती आणि रॅप यांचा संगम प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
या रॅप साँगचे चित्रीकरण अक्कलकोट, सांगोला आणि कोल्हापूर या पवित्र ठिकाणी करण्यात आले आहे. या गाण्याद्वारे श्री स्वामी समर्थांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांच्या लीलांचा अनुभव वेगळ्या शैलीत मांडण्यात आला आहे.
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रमुख कलाकार तेजस्विनी मोरे यांनी माहिती देताना सांगितले की, “श्री स्वामी समर्थांची महती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या जीवनावर अनेक कलाकृती आल्या, पण रॅप साँगच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदाच ही कथा मांडत आहोत. प्रेक्षकांना हे गाणे नक्कीच आवडेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
या रॅप साँगमध्ये तेजस्विनी मोरे, सोनम धणकुटे, नंदकुमार निळकंठ (एन के बावा), विशाल खांडेकर आणि बाल कलाकार वेदांत खांडेकर यांनी भूमिका साकारल्या आहेत.
तसेच या प्रकल्पासाठी स्वामी भक्त अमोल कोरे, अमोल बिडकर, सुहास पाटील यांच्यासह अनेकांनी मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हा उपक्रम साकार झाला असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या रॅप साँगचे प्रसारण महाराष्ट्रातील विविध स्थानिक चॅनल्स आणि टीव्ही प्लॅटफॉर्मवर करण्याचा मानस असून, ते प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
24 मे रोजी होणाऱ्या या भव्य लॉन्चिंग सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार असून, हा सोहळा कोल्हापूरच्या सांस्कृतिक विश्वात विशेष ठरणार आहे.

Comments
Post a Comment