जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती उत्साहात साजरी
कोल्हापूर ३०सिटी न्यूज नेटवर्क
जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त तळमजल्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) श्री. ओमप्रकाश यादव तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. अतुल आकुर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर येथील अध्यापिका श्रीमती सुषमा पाटील यांनी प्रभावीपणे केले.
यावेळी उपस्थितांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाजप्रबोधन, स्वच्छता व ग्रामविकासाच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.

Comments
Post a Comment