जी. एच. रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धा १ मे रोजी
कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क
चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने जी. एच. रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा ज्युनिअर (१९ वर्षाखालील) निवड बुद्धिबळ स्पर्धा शुक्रवार, दि. १ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा अयोध्या टॉवर (पाचवा मजला), दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर येथे होणार आहे.
जी. एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन आणि कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन यांच्या पुरस्कारा अंतर्गत होणाऱ्या या स्पर्धेसाठी युनिव्हर्सल सेक्युरिटी सर्व्हिसेसचे कॅप्टन उत्तम पाटील यांनी हॉल उपलब्ध करून दिला आहे.
स्पर्धा आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळ नियमांनुसार स्विस लीग पद्धतीने मुलं आणि मुलींच्या स्वतंत्र गटात खेळवली जाईल. सकाळी १० वाजता उद्घाटन होऊन पहिल्या फेरीला सुरुवात होईल. १ जानेवारी २००७ किंवा त्यानंतर जन्मलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंनाच सहभागाची संधी आहे.
या स्पर्धेतून मुलं व मुली गटातील प्रत्येकी चार खेळाडूंची निवड पुणे येथे १५ ते १७ मे दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर (१९ वर्षाखालील) निवड स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.
विजेत्या खेळाडूंना अनुक्रमे १०००, ८००, ७०० व ५०० रुपये रोख बक्षीस व चषक देण्यात येणार असून ७, ९, ११, १३ व १५ वर्षांखालील गटात प्रत्येकी दोन उत्तेजनार्थ चषक दिले जाणार आहेत. एकूण सुमारे ६ हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच निवड झालेल्या प्रत्येक खेळाडूस राज्य स्पर्धेनंतर संघटनेतर्फे १००० रुपयांचे प्रोत्साहन दिले जाणार आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश फी २०० रुपये ठेवण्यात आली असून इच्छुकांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रात्री ८ वाजेपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपर्क :
आरती मोदी – 8149740405
मनिष मारुलकर – 9922965173
रोहित पोळ – 9657333926
उत्कर्ष लोमटे – 9923058149
प्रीतम घोडके – 8208650388

Comments
Post a Comment